अहमदनगर, 20 ऑगस्ट: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप (Audio clip)व्हायरल झाली आहे. धक्कादायक म्हणजे ही केवळ ऑडिओ क्लिप नसून सुसाईड नोट आहे. तब्बल 11 मिनिटांच्या ऑडिओ सुसाईड नोटमध्ये या महिला अधिकाऱ्यानं लोकप्रतिनिधींवर आरोप करत काही घटना सांगितल्या आहेत.
आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांचाही संदर्भ या ऑडिओ क्लिप देण्यात आला आहे. ही ऑडिओ क्लिप नगर जिल्ह्यातल्या एका तालुक्यातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची असल्याचं समजतंय. या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे. दिव्य मराठीनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
काय म्हणाल्या महिला अधिकारी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये
लोकप्रतिनिधी त्रास देतात. तसंच प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचवले, असं त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
त्यांनी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ क्लिपमध्ये दिला असून आपल्याही मनात असाच विचार येत असल्याचं म्हटलंय. महिला अधिकारी म्हणून त्रास होत असल्याचं म्हणत वरिष्ठांकडून होणारं दुर्लक्ष तसंच नोकरीवर रुजू होताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात रुजू झाल्यानंतर झालेली निराशा या आणि अशा विविध गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आहे.
भारतीय सैन्याचं यश, दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
या ऑडिओ क्लिपमध्ये महिला अधिकारी अधून-मधून हमसून हमसून रडतानाही ऐकू यते आहे. ही ऑडिओ क्लिपच आपली सुसाईड नोट समजावी, असंही त्या म्हणाल्यात.
ऑडिओ सुसाईड नोटमधील मजकूर
दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतूक होईल. मला म्हणतील, "ओ शेट.. तुम्ही नादच केला थेट" अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरूषाला म्हणतात. बायांना कुठे शेठ म्हणता येते?
दीपाली तू हे कृत्य केल्याचं मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटतंय. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात. प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येत असतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दिडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार.
भाजप कार्यकर्त्यांचे खिसे कापणारी नाशिकची टोळी मुंबईत अटकेत
स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही कारण अहिलेलासुद्धा माफी नव्हती.
लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे, 'हे पहा पोथ्या वाचून तुझे नांव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही." त्यातून मला जिद्ध मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Suicide case, Viral audio clip