जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांचे खिसे कापणारी टोळी अटकेत, नाशिकच्या टोळीकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांचे खिसे कापणारी टोळी अटकेत, नाशिकच्या टोळीकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांचे खिसे कापणारी टोळी अटकेत, नाशिकच्या टोळीकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

या यात्रेदरम्यान एकीकडे कोविडच्या (Covid 19) नियमांचा फज्ज उडत होता तर दुसरीकडे चोरटे गर्दीचा फायदा घेत भाजप (BJP) कार्यकर्ते आणि नेत्यांचे खिसे कापण्यात व्यस्त होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 20 ऑगस्ट: दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांची ठाणे (Thane District) जिल्ह्यात जन आशीर्वाद (Jan Ashirwad Yatra) यात्रा निघाली. या यात्रेदरम्यान एकीकडे कोविडच्या (Covid 19) नियमांचा फज्ज उडत होता तर दुसरीकडे चोरटे गर्दीचा फायदा घेत भाजप (BJP) कार्यकर्ते आणि नेत्यांचे खिसे कापण्यात व्यस्त होते. या चोरट्यांच्या (Theft)टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या जन आशीर्वाद यात्रेत अनेक कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि काही रोख रक्कम चोरीला गेली. ज्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी लोकांचे खिसे कापण्यासाठी अशा गर्दीचा फायदा घेते. या प्रकरणी 4 जणांना दहिसरमधून अटक करण्यात आली. काबूल विमानतळावर तालिबानकडून AK47 नं लोकांवर गोळीबार अबूबाकर उस्मान अन्सारी (35), नादित अन्सारी वय 30 वर्षे, अतिक अहमद (51) आणि अश्पाक अन्सारी (38) अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी हे नाशिकच्या मालेगावचे रहिवासी असून ते मालेगावहून जन आशीर्वाद यात्रेसाठी ठाण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखोंची रक्कम तसंच 10 मोबाईल असा 6 लाख 69 हजाराचा मुद्देमाल आणि एक मारुती सुझुकी कार हस्तगत केली आहे. चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात