जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / शेतकऱ्यांचे उत्पन्न आता दुप्पट होणार; या राज्यात दुधासोबत शेणही खरेदी करणार सरकार

शेतकऱ्यांचे उत्पन्न आता दुप्पट होणार; या राज्यात दुधासोबत शेणही खरेदी करणार सरकार

शेतकऱ्यांचे उत्पन्न आता दुप्पट होणार; या राज्यात दुधासोबत शेणही खरेदी करणार सरकार

या प्रकल्पाअंतर्गत पहिला प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये सुरू केला जाईल. हा प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मथुरा, 03 नोव्हेंबर : आत्तापर्यंत सरकार शेतकऱ्यांकडून दूध (Milk) खरेदी करत असल्याचे आपण पाहिले असेल पण आता दुधाबरोबरच जनावरांचे शेणही (Cow Dung) सरकार विकत घेणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत नवीन योजना आखली आहे. शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करून त्याद्वारे वीज निर्मितीचे काम हाती घेतले जाणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे पशुधन, दूध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं की, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करेल आणि त्यातून वीज निर्मितीचे काम करेल. ते म्हणाले की, या प्रकल्पाअंतर्गत पहिला प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये सुरू केला जाईल. हा प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हे वाचा -  petrol diesel price : मोदी सरकारकडून दिवाळी भेट, पेट्रोल 5 तर डिझेलवर 10 रुपये उत्पादन शुल्क कपात सोमवारी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या ‘विकास प्रकल्पा’अंतर्गत वाराणसी दूध उत्पादक सहकारी महासंघासह चार पक्षांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री चौधरी माध्यमांशी बोलत होते. हा कार्यक्रम डिजिटल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. चौधरी म्हणाले की, या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. योजनेंतर्गत डेअरी प्रकल्पाची उपयुक्तता वाढेल. यामुळे शेतकऱ्यांना तसेच दूध संघाला जास्तीत जास्त नफा मिळेल. हे वाचा -  ‘तो आला, बसला आणि गेला पण नजरा मात्र तिच्यावरच अडल्या..’, मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत डेअरीला दूध आणणाऱ्या शेतकऱ्यांचे शेण खरेदी करून सरकार वीजनिर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे, तर दुसरीकडे शेणाचाही योग्य वापर होणार आहे. प्लांटमधील शेणाच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाईल. चौधरी म्हणाले की, या उपक्रमामुळे दूध उत्पादकांचा दूध उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल आणि गावपातळीवर न्याय्य व पारदर्शक दूध खरेदी व्यवस्था निर्माण होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात