मुंबई, 11 जून : राज्यात मान्सूनने (monsoon update) दक्षिण कोकणात (south Konkan) जोरदार हजेरी लावली आहे. गोव्यासह कोकणातील (goa Konkan rain) काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. (yellow alert) दरम्यान मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. (weather update)
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट (yellow alert) देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Rajya Sabha Election Result: किंगमेकरच्या भूमिकेतल्या देवेंद्र फडणवीस यांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आजपासून (ता. ११) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच तळ कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Intense showers along with thunder lightning was observed over Mumbai Thane and around in last 2,3 hrs. Now the patch of cloud is observed over North of Mumbai, over parts of Palghar
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2022
Parts of Raigad and Rtn too...
Mumbai IMD radar obs animated at 12.10 night 11 Jun pic.twitter.com/kKj8609iAH
मान्सून दक्षिण उत्तर प्रदेशपासून पश्चिम आसामपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस होणार आहे. मध्य प्रदेशपासून आंध्रच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्रसापाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Rajya Sabha Election 2022: ‘‘कोणाचा पराभव झाला?’’, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले….
पावसाळी हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भातील उष्ण लाट कमी झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. मागच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे.
मागच्या 24 तासात पुणे 35.3, धुळे 41.0, जळगाव 40.7, कोल्हापूर 33.6, महाबळेश्वर 25.6, नाशिक 36.3, निफाड 36.6, सांगली 34.8, सातारा 33.5, सोलापूर 35.2, सांताक्रूझ ३५.२, डहाणू 34.8, रत्नागिरी 32.6, औरंगाबाद 38.6, परभणी 34.7, नांदेड 41.0, अकोला 42.9, अमरावती 42.0, बुलडाणा 39.3, ब्रह्मपूरी 43.2, चंद्रपूर 42.0, गोंदिया 44.5, नागपूर 42.9, वाशीम 40.0, वर्धा 43.1, यवतमाळ 41.5 तापमानाची नोंद झाली.