जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / कापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का?

कापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का?

कापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का?

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कापसाचे भाव वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहेत. कापसाचा भाव $90/Lbs च्या खाली घसरला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये या किमती तब्बल 12 वर्षांच्या उच्चांकावर होत्या. कापसाचे भाव कमी झाल्याने आता हिवाळ्यात कपड्यांच्या किमती कमी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती टक्क्यांनी भाव कमी - ऑगस्टमध्ये किमती 17 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये, किंमत 21 टक्क्यांनी घसरली आहे. सप्टेंबरमध्ये भारतातील किंमत 32000 रुपये प्रति गाठी झाली.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कापसाचे भाव वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहेत. कापसाचा भाव $90/Lbs च्या खाली घसरला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये या किमती तब्बल 12 वर्षांच्या उच्चांकावर होत्या. कापसाचे भाव कमी झाल्याने आता हिवाळ्यात कपड्यांच्या किमती कमी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती टक्क्यांनी भाव कमी -  ऑगस्टमध्ये किमती 17 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये, किंमत 21 टक्क्यांनी घसरली आहे. सप्टेंबरमध्ये भारतातील किंमत 32000 रुपये प्रति गाठी झाली. जूनमध्ये 52400 रुपये प्रति गाठी भाव होता. या काळात किमती 40 टक्क्यांनी घसरल्या. किंमती का कमी झाल्या - दरम्यान, या किमती का कमी झाल्या याचे कारण समोर आले आहे. किमती कमी होण्यामागे जागतिक मंदी हे कारण असल्याचे मत व्यक्त केले जात आहेत. तसेच चीनमधील लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादनही यामागे असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा -  Cotton Rate : कापसाच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना अच्छे दिन तर सूत गिरण्या संकटात? आणखी किमती कमी होणार - यानंतर या कापसाच्या किंमती आणखी 10-15% कमी होऊ शकतात. तसेच निर्यातीतही 10 % घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कापसाचा भावाने निच्चांकी गाठली आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात कपडे स्वस्त होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ऑगस्टमध्ये होता चांगला भाव - 18 ऑगस्टपर्यंत देशात 124.17 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आलीये.गेल्या वर्षी याच काळात 116.51 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली होती. जगात कापसाचे उत्पादन अमेरिकेत होत असते या देशात यंदा कापसाचे उत्पादन तब्बल 28 टक्क्यांनी घटल्याचे तिथल्या तज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 35 टक्के पिकाची परिस्थिती खूप खराब आहे. तर मागच्या महिन्यात कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात चांगलीच तेजी येताना दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात