मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Cotton Rate : कापसाच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना अच्छे दिन तर सूत गिरण्या संकटात?

Cotton Rate : कापसाच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना अच्छे दिन तर सूत गिरण्या संकटात?

कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात मात्र चांगलीच तेजी येताना दिसत आहे. (Cotton Rate)

कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात मात्र चांगलीच तेजी येताना दिसत आहे. (Cotton Rate)

कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात मात्र चांगलीच तेजी येताना दिसत आहे. (Cotton Rate)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 26 ऑगस्ट : कापूस काढणीच्या हंगामाला एक महिना बाकी असताना कापसाच्या दरात मात्र चांगलीच तेजी येताना दिसत आहे. (Cotton Rate) विदर्भ आणि मराठवाड्यात नवीन कापसू येण्यास कालावधी असला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील सुत गिरण्या डबघाईला येण्याची शक्यता आहे. कापसाचे दर वाढल्यास सुतगिरण्यामध्ये येणारा माल चढ्या भावाने येणार असल्याने कापड उद्योगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नवीन कापूस बाजाार समित्यांमध्ये येण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. परंतु कापसाचे भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महागाईमुळे सूत आणि कापड गिरण्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. महाग कापसामुळे कापड उद्योग मागच्या कित्येक वर्षांपासून अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस खरेदीच्या दरात तब्बल 61 टक्के वाढ झाली आहे. बाहेरच्या देशात कापसाच्या भावात चांगलीच वाढ होत असल्याने कापूस आयात करण्याच्या शक्यताही कमी झाल्या आहेत.

हे ही वाचा : सत्तेत आल्याच्या काही दिवसात शिंदे-फडणवीस सरकारची नामांतराबाबत मोठी घोषणा

जगात कापसाचे उत्पादन अमेरिकेत होत असते या देशात यंदा कापसाचे उत्पादन तब्बल 28 टक्क्यांनी घटल्याचे तिथल्या तज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 35 टक्के पिकाची परिस्थिती खूप खराब आहे. त्यामुळे अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटून 27 लाख टन राहू शकते. गेल्या वर्षी अमेरिकेत 38 लाख टनांहून अधिक जास्त कापसाचे उत्पादन झाले असल्याचे कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटल्यास त्याचा फटका हा निर्यातीला देखील बसणार आहे.

कापसाचे नवीन पिक येण्यास महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे. नवीन कापूस बाजारात येत नाही तोपर्यंत कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. वाढते उत्पादन आणि मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन सूत गिरण्यांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मर्यादित पुरवठ्यामुळे अगोदरच उत्पादन कमी आहे. तामिळनाडूतील स्पिनिंग मिल संघटनेने सर्वच सूत गिरण्यांना सूताचे उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांचा अधिकार ते शिवसेनेला की शिंदे गटाला दिलासा, 'सुप्रीम'सुनावणीचा सस्पेन्स वाढला

कापसाची मागणी ,पुरवठा आणि दराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. नवीन पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकतील. यंदा कापसाची लागवडही गेल्यावर्षी पेक्षा जास्त आहे. 18 ऑगस्टपर्यंत देशात 124.17 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आलीये.गेल्या वर्षी याच काळात 116.51 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली होती.

First published:

Tags: Agriculture, Farmer