मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Wheat Export Ban : भारताच्या गव्हाला ज्या व्हायरसमुळे तुर्कस्तानने नाकारले, तो व्हायरस आहे तरी काय?

Wheat Export Ban : भारताच्या गव्हाला ज्या व्हायरसमुळे तुर्कस्तानने नाकारले, तो व्हायरस आहे तरी काय?

भारताने गव्हाची निर्यात बंदी (wheat Export Ban) केल्यावर देशासह जगातील सर्वच देशांनी निर्यात बंदी बाबत भाष्य केले. परंतु भारतातील गहू उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट आले आहे

भारताने गव्हाची निर्यात बंदी (wheat Export Ban) केल्यावर देशासह जगातील सर्वच देशांनी निर्यात बंदी बाबत भाष्य केले. परंतु भारतातील गहू उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट आले आहे

भारताने गव्हाची निर्यात बंदी (wheat Export Ban) केल्यावर देशासह जगातील सर्वच देशांनी निर्यात बंदी बाबत भाष्य केले. परंतु भारतातील गहू उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट आले आहे

  नवी दिल्ली, 04 जून : भारताने गव्हाची निर्यात बंदी (wheat Export Ban) केल्यावर देशासह जगातील सर्वच देशांनी निर्यात बंदी बाबत भाष्य केले. भारताने घातलेली निर्यात बंदी तुर्तास उठवावी असे अनेक देशांनी भारताला सांगितले. परंतु भारतात होणाऱ्या गव्हाचे उत्पादन आणि भविष्याचा विचार करून ही निर्यात बंदी तशीच राहिल असे कृषी मंत्रालयाकडून (central agriculture department) सांगण्यात आले. दरम्यान दुसरीकडे तुर्कस्तानने भारताने दिलेला गहू खराब (Damage Wheat) असल्याचे सांगून परत केला आहे. (Rubella virus) तसेच गव्हावर रुबेला व्हायरस असल्याचे तुर्कस्तानकडून सांगण्यात आले आहे.

  29 मेपासून 56 हजार 877 टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कस्तानातून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. गव्हात रुबेला विषाणू (Rubella virus) आढळल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे. त्यामुळे ते परत पाठवत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान देशातील गव्हाच्या निर्यातबंदीवर यापूर्वीच अनेक विरोधी नेत्यांनी गव्हावरील निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना चालना द्यावी असे सांगितले होते. आदिच शेतकरी संकटात असताना तुर्कस्तानकडून पाठवण्यात आलेला गव्हाचा बोजा आल्याने शेतकऱ्यांच्या नव्याने उत्पादन केलेल्या गव्हाच्या दरात घसरण होईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला अखेर परवानगी, सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी-शर्थी

  रुबेला रोग म्हणजे काय?

  रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हे बऱ्याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दर्शवते. यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा संसर्ग 3-5 दिवस टिकू शकतो आणि जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा नाक आणि घशातून स्राव येतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.

  रुबेला रोगाची लक्षणे कोणती?

  रुबेला रोगाची लक्षणे सर्वांनाच जाणवतात दरम्यान याची लक्षणे सौम्य असतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या माहितीनुसार, (Centers for Disease Control and Prevention) प्रौढांना सामान्यत: बारीक ताप, घसा खवखवणे आणि याचबरोबर पहिल्यांदा चेहऱ्यावर लाल पुरळ येतात. यासोबत इतर लक्षणेही आहेत. डोकेदुखी, डोळे लालसर होऊन बारीक सुजतात. यानंतर शरीराच्या इतर भागात पसरते रुबेला पसरत असतो. रुबेला हा व्हायरस संसर्गजन्य आहे.

  तुम्ही डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा

  रुबेलाची लक्षणे सौम्य असली तरी काही जणांना याचा त्रास जाणवतो असे डॉक्टरांचे मत आहे. रुबेलाची लागण झालेल्या काही स्त्रियांना संधिवात होण्याची शक्यता आहे. अशी लक्षणे काही महिलांमध्ये दिसून आली आहेत. किमान एक महिना याचा त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे माहितीनुसार, रुबेलामुळे कानात संसर्ग होऊ याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मेंदूला सूज येऊ शकते. याव्यतिरिक्त, जर एखाद्या गर्भवती महिलेला रुबेलाची लागण झाली असेल, तर त्याचा बाळावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

  रुबेला संसर्ग कसा टाळायचा

  रुबेला रोग टाळण्यासाठी रुबेलाची लस घेऊ शकतो, (combined measles mumps rubella vaccine) याला MMR लस देखील म्हणतात. मुलांना 12 ते 15 महिने वयाच्या आणि 4 ते 6 वर्षांच्या दरम्यान इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. 

  हे ही वाचा : Weather Update : यंदा monsoon हुलकावणी देण्याची शक्यता, मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

  गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता?

  युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली. भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचे आरोप चिंताजनक असू शकतात. रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कस्तानने भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Turkey

  पुढील बातम्या