मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sugarcane Production : देशात अद्यापही 29 साखर कारखाने सुरू, यंदा साखर उत्पादनाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता

Sugarcane Production : देशात अद्यापही 29 साखर कारखाने सुरू, यंदा साखर उत्पादनाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता

जून महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला तरी देशासह राज्यात साखर कारखाने (sugar factories) सुरू आहेत.

जून महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला तरी देशासह राज्यात साखर कारखाने (sugar factories) सुरू आहेत.

जून महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला तरी देशासह राज्यात साखर कारखाने (sugar factories) सुरू आहेत.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 12 जून : जून महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला तरी देशासह राज्यात साखर कारखाने (sugar factories) सुरू आहेत. दरम्यान देशातील मागच्या चार दिवसांपर्यंत 29 कारखाने सुरू (sugarcane farmer) होते तर राज्यातील 18 कारखाने सुरू होते. याचबरोबर राज्यातील 2 लाख टनांच्या आसपास ऊस गाळप (Sugarcane sifting) शिल्लक राहिले होते. दरम्यान या कालावधीत यंदा 352 लाख टन साखर उत्पादन (Sugar production) झाले आहे. मागच्यावर्षीपेक्षा 45 लाख टन साखरेचे उत्पादन जादा झाले आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत देशातील केवळ 4 साखर कारखाने सुरू होते. सध्या सुरू असणाऱ्या कारखान्यांमधील सुमारे 90 टक्के कारखाने हे फक्त एकट्या महाराष्ट्रातील आहेत. 30 सप्टेंबरअखेर म्हणजे हंगामाचा शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे 6 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदाचे साखर उत्पादन 360 लाख टनापर्यंत जाईल, असा सुधारित अंदाज 'इस्मा'चा आहे. मागच्यावर्षी इथेनॉलकडे 20 लाख टन साखर वळूनही 311 लाख टन उत्पादन झाले होते. यंदा 34 लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरून ही 360 लाख टनांपर्यंत साखर उत्पादन जाईल, असा अंदाज असल्याचे दै. अग्रोवनने दिला आहे.

हे ही वाचा : Liquid Nano Urea : देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करणारा नॅनो युरिया नेमका आहे तरी काय?

6 जूनअखेर देशातील साखर कारखान्यांनी 'इस्मा'ला दिलेल्या अहवालानुसार, एप्रिलअखेरची साखर विक्री 160 लाख टन इतकी  झाली आहे. ती गेल्या वर्षी याच कालावधीत 152 लाख टन होती. यंदा 7.5 लाख टनांनी देशांतर्गत विक्री वाढली असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी जूनअखेर साखर कारखान्यांना दिलेला विक्री कोटा या वर्षीच्या जूनच्या तुलनेत 5.5 लाख टनांनी जादा आहे. याचा विचार केल्यास यंदाचा साखरेचा खप 275 लाख टन इतका असेल असे सांगण्यात आले.

67 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज

गेल्या वर्षी कारखान्यांनी 265 लाख टन साखर देशांतर्गत बाजारात विकली होती. 1 ऑक्टोंबर 2021 अखेर 82 लाख टनांचा प्रारंभिक साठा होता. 275 लाख टन स्थानिक विक्री, 100 लाख टन निर्यात आणि 360 लाख टन साखरेचे उत्पादन हे समीकरण लक्षात घेता 30 सप्टेंबर 2022 अखेर 67 लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी ही साखर पुरेशी असेल. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने नुकतीच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

हे ही वाचा : Multibagger Share: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांची 1 लाख गुंतवून 70 लाखांची कमाई, तुमच्याकडे आहे का?

उपग्रहाद्वारे घेणार ऊस उपलब्धतेचा अंदाज

जून 2022 च्या उत्तरार्धात उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुढील वर्षी किती ऊस तोडणीसाठी उपलब्ध होईल, या बाबतचा अंदाज घेण्यात येणार आहे. प्रतिमा उपलब्ध झाल्यास पुन्हा साखर उद्योगातील प्रमुख व्यक्ती, संस्थांची बैठक 'इस्मा'च्या वतीने घेण्यात येईल. पुढील हंगामासाठीचा आराखडा तयार करण्यात येईल.

First published:

Tags: Farmer, Sugar, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

पुढील बातम्या