Home /News /agriculture /

Liquid Nano Urea : देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करणारा नॅनो युरिया नेमका आहे तरी काय?

Liquid Nano Urea : देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करणारा नॅनो युरिया नेमका आहे तरी काय?

मागच्या तीन वर्षांत खतांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने रासायनिक खते (chemical fertilizers) शेतीसाठी वापरने कठीण झाले आहे.

  नवी दिल्ली, 12 जून: देशात खतांच्या (Indian fertilizers) किंमती भरमसाठ वाढत आहेत. मागच्या तीन वर्षांत खतांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने रासायनिक खते (chemical fertilizers) शेतीसाठी वापरने कठीण झाले आहे. दरम्यान शेतकऱ्याला सर्वात जास्त खतांमध्ये युरिया लागत (uria) असतो. पंरतु युरियाचा काही प्रमाणात तुटवडा होत असल्याने शेतकऱ्यांना तो ही मिळत नसतो. यावर इफ्कोच्या गुजरातमधील (iffco Gujrat) कंपनीने लिक्विड युरिया (liquid uria) काढला आहे. (Liquid Nano Urea)

  इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) गुजरातमधील कलोल येथे देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे. या युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देतो. पीक उत्पादनासाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे नॅनो युरिया देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट करू शकते.

  हे ही वाचा : यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून; पवित्र गुहेच्या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या!

  काय आहे नॅनो युरिया?

  नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक युरियाच्या घटकास नॅनो युरिया असे म्हटले जाते. पारंपरिक युरियाला नॅनो युरिया हा पर्याय होऊ शकेल आणि 50 टक्क्यांनी युरियाचा वापर कमी करू शकेल. नॅनो लिक्विड युरिया हे पूर्णपणे भारताने विकसित केलेले उत्पादन आहे.

  असा होईल फायदा

  द्रवरूप नॅनो युरिया दोन टप्प्यांत थेट पिकांच्या पानांवर फवारता येणार आहे. पिकांना पूर्वीसारखे जमिनीतून युरिया पोहोचविण्याची गरज उरणार नाही. द्रवरूपातील अल्ट्रा स्मॉल पार्टिकल्स पानांच्या माध्यमातून जमिनीत शोषले जातात.

  पारंपरिक पद्धतीत 70 टक्के युरिया पिकांपर्यंत न पोहोचता अतिपाण्यामुळे जमिनीत मुरून बसतो किंवा हवेत उडून जातो. थोडक्यात वाया जायचा. ज्यामुळे जमीन अॅसिडिक बनते. जलस्रोत प्रदूषित होतात. जमिनीतील युरियाच्या वापराला आळा घालण्यासाठी संशोधकांनी द्रव रूपातील नॅनो युरिया विकसित केले आहे. नॅनो युरिया ड्रोनच्या माध्यमातूनही पिकांवर फवारता येणार आहे. पिकांवर फवारण्यासाठी एक लीटर पाण्यात 2-4 मिलीलिटर नॅनो युरिया मिसळावे लागते.

  हे ही वाचा : फक्त चार कागदपत्रे द्या आणि गाई, शेळ्या, म्हैशी घेऊन जा; ठाकरे सरकारची पशुपालन योजना माहिती आहे का?

  असे आहेत नॅनो लिक्विड युरियाचे फायदे

  द्रव रूपातील नॅनो युरिया हे पिकांच्या पोषणासाठी प्रभावी आणि कार्यक्षम आहे, जे सुधारित पोषण गुणवत्तेसह उत्पादन वाढवते. नॅनो युरिया लिक्विडच्या वापरामुळे पर्यावरण, पाणी आणि मातीचे प्रदूषण होणार नाही. युरियावरील खर्च कमी झाल्याने तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. 

  नॅनो युरिया बाटली स्वरूपात मिळणार असल्याने खतांच्या साठवणुकीसाठी लागणारे गोदाम, वाहतूक आदींच्या खर्चात बचत होऊ शकते. नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली साधारण 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे पारंपरिक युरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना मिळणार आहे. येत्या काळात देशभरात असे आणखी 8 प्रकल्प उभारण्यात येणार. चालू आर्थिक वर्षात पाच कोटी बाटल्यांचे उiffco Gujratत्पादन करण्याचे लक्ष्य.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer

  पुढील बातम्या