नाशिक 1 डिसेंबर : बळीराजाला प्रत्येक वर्षी नव्या संकटांचा सामना करावा लागतो. हातातोंडाशी आलेलं पिक हे कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे दूर जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. टोमेटॉच्या पिकानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदा संकटात टाकलं आहे. अक्षरश: कवडीमोल दरानं टोमॅटो विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तरुण शेतकऱ्याची व्यथा नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावातील योगिता धोंगडे या तरुण महिलेचे झालेली आहे.योगिता या दहावी पास आहेत.मात्र त्यांनी घरकामासह पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करायचं ठरवलं. योगिता यांच्या शेतामध्ये जवळपास 3 एकर टोमॅटो आहे. या टोमॅटोच्या लागवडीसाठी खर्चही खूप झालाय. घरातील सर्व पैसा त्यांनी शेतात टाकला आहे. टोमॅटोला सध्या फक्त 80 ते 100 रुपयांपर्यंत कॅरेटला भाव मिळत असल्यानं त्या हतबल झाल्या आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं आम्हाला मदत करावी अन्यथा घर चालवणं देखील आम्हाला अवघड होऊन जाईल अशी प्रतिक्रिया योगिता यांनी दिली आहे. ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला अनेक शेतकऱ्यांची व्यथा नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून टोमॅटो लावला आहे. त्याची देखभाल केली आहे. उत्पादन ही चांगलं आलं आहे. मात्र, मालाला भाव नाही. अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यातचं टोमॅटोला भाव नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांवर आली फुकट भाजी वाटण्याची वेळ, Video पाहून डोळ्यात येईल पाणी! हमी भावाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आपल्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून सरकारला साद घालतोय. निवडणुका आल्या की हे सर्व विषय समोर आणून शेतकऱ्यांची मतं घेतली जातात. त्यावर पुढे काहीच होत नाही. पुन्हा शेतकऱ्याला संकटाना सामोरे जावे लागते. कवडीमोल भावानं माल विकण्याची वेळ त्याच्यावर येते. हमी भाव मिळाला तर शेतकऱ्याचा झालेला खर्च भरून निघेल आणि दोन पैसे त्याच्या पदरात पडतील. अन्यथा निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची भीती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.