दिल्ली, 3 मे : मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानात २ अंशानी वाढ झाल्याचे तज्ञाचं म्हणणं आहे. दरम्यान उन्हाळाच्या दिवसांत पिकांबरोबर फळझाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योग्य नियोयजनाची गरज आहे. पाण्यासोबत लागवडीचे नियोजन केल्यास फळबागांचे नुकसान होण्यापासून मदत होते. (gardening)
मागच्या वर्षी ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागात फळझाडांना उन्हाळ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रसंगी ही झाडे दगावूही शकतात. अशा वेळी या दिवसात या झाडांची काय काळजी घ्यावी, याची माहिती घेणं आवश्यक ठरतं.
आपल्याकडे गतवर्षी पाऊस दीर्घकाळ पडला परंतु यामुळे नुकसानच अधिक झाल्याचे दिसून आलं आहे. दरम्यान काही भागात पावसाने दडी मारल्यामुळे त्या भागात आताच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. यासाठी ज्या भागात पाण्याची कमतरता भासते उन्हाळा जास्त जाणवतो त्या भागात तेथे कमी पाण्यावर टिकाव धरणारी काटक फळझाडे लावणे आवश्यक आहे. उदा. बोर, सीताफळ, डाळिंब, आवळा ही फळझाडे निवडावीत व त्यांची लागवड करावी.
हे ही वाचा : Untimely Rain : अवकाळी पावसाचा हंगामी पिकांना फटका, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नुकसान
1. गरम झळांपासून बागेचा बचाव व्हावा म्हणून बागेच्या सभोवार निलगिरी, मलबेरी, शेवरी, शिकेकाई, सुबाभूळ, प्रोसोफीस, नीम, चिंच, शेवगा, पांगारा या वारा प्रतिबंध झाडांची रांग वा पट्टा लावणे फायद्याचे ठरते. पन्हेरीतील रोपे व कलमांना तसेच शेतात लावलेल्या कलमांना वाचविण्यासाठी एप्रिल महिना निवडल्यास अधिक सोपे जाते. 2. लागवडीचे नियोजन करताना घ्यावयाची काळजी मोठ्या बागेतील मोकळ्या जागेत पालापाचोळा, तणस इ.चे आवरण घालावे. आवरणाचा थर तीन ते चार इंच असावा. उन्हाळ्याच्या सुरुवातीस खोडाला सफेदी लावावी. सफेदीसाठी जस्त सल्फेट 2 किलो, विरजलेला चुना 20 किलो, पाणी 500 लिटर असे द्रावण करून झाडाच्या खोडावर 1 ते दीड इंच मीटर लावावे किंवा बोर्डोपेस्ट तयार करून ते लावावे. त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात परावर्तित होईल. (gardening)
3. गवताच्या पेंड्या केळी व पपईसाठी झाडाच्या खोडावर सोपट, पाने, गवताच्या पेंड्या बांधाव्यात. झाडांना उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. त्यामुळे पाण्याची काटकसर होऊन जास्त झाडांचे ओलीत तेवढ्याच पाण्यात जाईल. याशिवाय मोठ्या झाडांना काटकसरीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. यासाठी मातीचा वरंबा कर्णाच्या दिशेने टाकावा व अर्ध्या भागात एकदा व अर्ध्यात दुसर्या वेळी पाणी द्यावे. असे केल्याने 50 टक्के पाण्याची बचत होते. वरील सर्व पद्धतीत पाण्याच्या दांडात व झाडाच्या वाफ्यात 3 ते 4 जाडीचे गवत/पाचोळ्याचे/गव्हांडा वा धानतुसाचे आवरण घालणे उपयुक्त ठरते. साधारणपणे केळीच्या बागेला जास्त पाणी लागते; मात्र अवर्षण व पाणी टंचाईच्या काळात केळीच्या आळ्यात दोन ते चार पालापाचोळा/गवताचे आवरण घाला, तसेच केळीच्या पानावर 6 ते 8 टक्के तीव्रतेचे केओलीन या पावडरचे द्रावण फवारले, तर पाण्याच्या काही पाळ्या कमी लागतात. एक हेक्टर केळीबागेला सुमारे सहा किलो केओलीन लागते. ही फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
शेवाळाचा वापर कडक उन्हाळ्यात आंबा, चिकू, संत्रा कलमे वाचवण्यासाठी कलमांच्या जोडावर शेवाळ ओले करून बांधावे. ते दर तिसर्या दिवशी ओले करावे. त्यामुळे कलम वाळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. फवारा सिंचन पद्धतीत पाण्याचा वापर काटकसरीने होतो; मात्र भांडवली खर्च जास्त येतो. म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा भाडेपद्धतीने ही सामग्री वापरणे सोईचे होईल. ठिबक पद्धत ही एक आधुनिक व अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची पद्धत आहे. यात थेंब थेंब पाणी देण्याची सोय असते. उन्हाळ्याच्या दिवसात फळझाडांसाठी याचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होईलच; शिवाय कमी पाण्यात मोठी जमीन ओलिताखाली आणता येईल.