कोल्हापूर, 22 डिसेंबर : कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. दिनांक 23 ते 26 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानात हे प्रदर्शन होणार आहे. डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2022 चे आयोजन केले आहे. यंदाचे हे प्रदर्शनाचे चौथे वर्ष आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले लोक हे प्रदर्शन बघायला येत असतात. या कृषी प्रदर्शनात यंदा एक्वा फोनिक यासारखे आधुनिक नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान, वेगवेगळ्या माध्यमांतून शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली प्रगती, या गोष्टी लाखो शेतकऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन कसं वाढवता येईल हे सांगण्याचा मूळ उद्देश कृषी प्रदर्शनाचा आहे. एक्वा फोनिक तंत्रज्ञान म्हणजे काय, याद्वारे शेती कशी होते, याच्या संदर्भातील प्रात्यक्षिके प्रदर्शनात दाखवली जाणार आहेत. त्याच बरोबर मत्स्य व्यवसायातील प्रात्यक्षिके देखील शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत, अशी प्रदर्शनाबाबतची माहिती देताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
Solapur : पशुसंवर्धन विभागातील योजनांचा घ्या फायदा, लगेच करा अर्ज
काय-काय असणार आहे प्रदर्शनात? या प्रदर्शनात शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 200 पेक्षा अधिक पशु-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री पुष्पप्रदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल आदींचा समावेश आहे. त्याच बरोबर या प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. काही शेतकऱ्यांचा, स्टॉल्सना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे, पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत. यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, पांढरे उंदीर, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारची कुत्री, पक्षी विविध जनावरांच्या जाती पहायला मिळणार आहेत.
Solapur : सिद्धेश्वर यात्रेचं काऊंटडाऊन सुरू, 1 कोटींचा रेडा ठरणार खास आकर्षण
विविध विषयांवर होणार मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनात 24 डिसेंबरला अरुण देशमुख, सुरेश कवाडे यांच्याकडून मार्गदर्शन होणार आहे. तर 25 डिसेंबरला डॉ. सॅम लुद्रिक यांचे जनावरांचे रोग व्यवस्थापन यावर तर अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय यावर मार्गदर्शन होईल. मोठ्या संख्येने या भव्य अशा कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देखील आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
गुगल मॅपवरून साभार
कृषी प्रदर्शनाचा पत्ता : तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर