Home /News /agriculture /

puntamba shetkari agitation : शेतकऱ्यांचे कैवारी आहेत तरी कुठे? पुणतांबा शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला सवाल, मोफत वाटले कांदे, द्राक्ष!

puntamba shetkari agitation : शेतकऱ्यांचे कैवारी आहेत तरी कुठे? पुणतांबा शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला सवाल, मोफत वाटले कांदे, द्राक्ष!

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी सरकाच्या विरोधात पुन्हा एकदा किसान क्रांतीची मशाल पेटवली आहे. (puntamba shetkari agitation)

  सुनिल दवंगे,

  अहमदनगर 2 जून : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी सरकाच्या विरोधात पुन्हा एकदा किसान क्रांतीची मशाल पेटवली आहे. (puntamba shetkari agitation) शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत राज्य सरकारला सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर येथील शेतकऱ्यांनी पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर 5 दिवसीय धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोल दर मिळत असलेल्या शेतीमालाचा मुद्दा पुढे केला. कांद्यासह कलिंगड, द्राक्ष यांच्या विक्रीला भाव मिळत नाही. त्यामुळे हा शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याऐवजी आंदोलनाच्या ठिकाणीच मोफत वाटप करुन सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

  23 मे रोजी पुणतांबा येथे ग्रामसभा घेवून सरकारला सात दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र सरकारने याची दखल घेतली नाही. त्यामुळे 1 जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

  हे ही वाचा : औरंगाबाद दौऱ्याच्या आधी आली मुख्यमंत्र्यांना जाग, पाणी प्रश्नावर दिले कडक आदेश

  आज सरकारच्या निर्णयाचा आणि धोरणाचा निषेध करण्यासाठी  आंदोलन कर्ते शेतक-यांनी आगळावेगळा प्रयोग आंदोलनाच्या ठिकाणी केला आहे. ज्या शेतीमालाला कवडीमोल दराने विकावे लागत आहे  अशा सर्वच फळे आणि भाजीपाला गोरगरीबांना, तसेच नागरीकांना फुकटात वाटप करण्यात आला. स्थानिक पातळीवर शेतीमालाची काय स्थिती आहे हे दाखवून देण्यासाठी अशा वेगळ्या प्रकारे आंदोलनात उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी कांदा, द्राक्ष आणि कलिंगड नागरिकांना फुकट वाटले. यामुळे तरी किमान शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे.

  महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत साखर कारखाने हे सुरु राहणार असून असे अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे . पुणतांबा येथील आंदोलनामध्ये ऊसाच्या गाळपासून ते साखरेच्या उत्पादनपर्यंत विषय घेण्यात आले आहेत. त्यामुळे शिल्लक ऊस उत्पादकांना अनुदान द्यावे, उर्वरीत ऊसाचे वेळेत गाळप करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. शिवाय दुसऱ्या दिवसापासून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी येण्यास सुरवात झाली आहे.

  (हे ही वाचा : Seed Festival starts in Akola : अकोल्यात बियाणे विक्री महोत्सवास सुरुवात; तब्बल ८२६ शेतकऱ्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध)

  शेतकऱ्यांचे कैवारी आता कुठे, शेतकऱ्यांचा प्रश्न

  2017 मध्ये किसानक्रांतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारत शेतकरी संप सुरु केला होता. त्यास कॉंग्रेस , शिवसेना अशा पक्षांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिला होता. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्साने शेतकरी प्रश्न किती गांभीर्याने घेतात असा प्रश्न आंदोलनकारी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 2019 कृषीकन्या यांनी आमरण उपोषण सुरु करत शेतक-यांना न्याय मिळावा अशी मागणी केली होती. त्यावेळी आंदोलन दडपडण्यात आले होते. आता दोन दिवसापासून धरज्णे आंदोलन सुरु आहे मात्र, पहिल्या दिवशी तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Puntambe

  पुढील बातम्या