मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sugar Export : देशातील कच्च्या साखरेला निर्यातीस परवानगी मिळण्याची शक्यता

Sugar Export : देशातील कच्च्या साखरेला निर्यातीस परवानगी मिळण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीस बंदी आणली. (Central government bans sugar exports) यांबदीवर देशभरातील शेतकरी (FARMER) नेत्यांनी आक्षेप घेतला.

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीस बंदी आणली. (Central government bans sugar exports) यांबदीवर देशभरातील शेतकरी (FARMER) नेत्यांनी आक्षेप घेतला.

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीस बंदी आणली. (Central government bans sugar exports) यांबदीवर देशभरातील शेतकरी (FARMER) नेत्यांनी आक्षेप घेतला.

  मुंबई, 18 जून : मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून साखर निर्यातीस बंदी आणली. (Central government bans sugar exports) यांबदीवर देशभरातील शेतकरी (FARMER) नेत्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान यंदा देशात साखर उत्पादन वाढल्याने (sugar production hike) साखरेची निर्यात व्हावी अशी साखर व्यापाऱ्यांनीही (sugar export) केली आहे. सध्या देशभरात निर्यातीस तयार असलेली साखर ही 5 ते 10 लाख टन शिल्लक आहे. या साखरेला निर्यातीची परवानगी द्यावी अशी मागणी साखर उद्योगाती संस्थानी मागणी केली आहे. तसेच कच्च्या साखरेला (Raw sugar) परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

  साखरनिर्यातीवर निर्बंध आणल्याने उद्योगाचे नुकसान होत असून, सध्या निर्यात प्रक्रियेत असणाऱ्या ५ ते १० लाख टन कच्च्या साखरेच्या निर्यातीस केंद्राने तातडीने परवानगी द्यावी. अशी मागणी साखर उद्योगातील संस्थांनी केली आहे. दरम्यान काल( दि.17) रोजी अन्नपुरवठा मंत्रालयाचे केंद्रीय अधिकारी व देशभरातील साखर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रमुख निर्यातदार यांची नुकतीच बैठक झाली.

  हे ही वाचा : Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन

  यामध्ये साखर उद्योगातील सर्वच घटकांनी अगदी जोरदारपणे केंद्राकडे निर्यातीबाबत अनुकूल निर्णय घेण्याची मागणी केली. अधिकारी आमच्या मागणीकडे सकारात्मकपणे पाहत असून लवकरच कच्च्या साखरेला निर्यातीस परवानगी मिळण्याचा शक्यता असल्याची माहिती बैठकीत सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली.

  केंद्राने काही दिवसांपूर्वीच कारखान्यांना मागणीच्या ४५ टक्क्यांपर्यंत साखरनिर्यात कोटा दिला होता. विशेष करून कच्ची साखर नियांतीचे करार होऊनही केंद्राने मान्यता न दिल्याने कच्च्या साखरेचे नुकसान होत आहे. ही साखरनिर्यात न झाल्यास साखर खराब होणार असल्याने जेवढे करार झाले आहेत त्या सर्व निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातील संस्थांनी केली. अनेक कारखान्यांना या कराराच्या आधारावर ऊस बिलासाठी रक्कम मिळालेली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत करार केलेली परदेशात जाणे अपरिहार्य असल्याचे साखर कारखानदारांनी केंद्रीय अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले.

  हे ही वाचा : 'अय...जरा भानावर राहत जा' इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनलवाल्यांना सुनावले, VIDEO

  निर्यातीवरील निर्बंध कमी करून जास्तीत जास्त साखर निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी साखर उद्योगाच्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत केंद्रीय अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्ट आश्वासन दिले नसले तरी त्यांना साखर उद्योगाचे म्हणणे पटले आहे. येत्या काही दिवसांत पाच ते दहा लाख टन कच्च्या साखरेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ऑगस्टला ७५ लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर होऊ शकतो, असे सूतोवाच बैठकीत सहभागी साखर उद्योगातील संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर केले. 

  आम्ही साखर उद्योगाची बाजू जोरदारपणे केंद्रीय अधिकाऱ्यांकडे मांडल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. काही दिवसांत सकारात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar, Sugar facrtory, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

  पुढील बातम्या