मुंबई, 9 जुलै: सरकार देशभरात अशा अनेक योजना राबवत आहेत, ज्यांचा थेट लाभ गरजू आणि गरीब वर्गापर्यंत पोहोचत आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी असून, विविध स्तरातील लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू आहेत. एकीकडे राज्य सरकार आपल्या स्तरावर अनेक योजना राबवत असताना, दुसरीकडे केंद्र सरकारही देशवासियांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana). यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या 12व्या हप्त्याची (PM Kisan Yojna 12th Installment) प्रतीक्षा आहे.लवकरच या योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. हा हप्ता कधी येऊ शकतो हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया. अशा प्रकारे पैसे दिले जातात- पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. एका आर्थिक वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवला जातो, तर दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतात. तसेच तिसऱ्या हप्त्याचे पैसे डिसेंबर ते मार्च या दरम्यान येतात. हेही वाचा: Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुढील हप्त्यासाठी ई-केवायसी आवश्यक- तुम्हाला 12 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही ई-केवायसी न केल्यास, तुमचे पुढील हप्त्याचे पैसे अडकू शकतात. तुम्ही याप्रमाणे ई-केवायसी करू शकता:- स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत शेतकरी पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा आणि येथे ’e-KYC’ पर्यायावर क्लिक करा. स्टेप 2: आता तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाका. असे केल्याने तुमचे ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल. हेही वाचा: Safety Tips: पावसाळ्यात दुचाकी चालवताना ‘या’ 6 गोष्टी आधी पाहा; नाहीतर अपघात झालाच म्हणून समजा 12 वा हप्ता कधी येऊ शकतो? 12 व्या हप्त्याबद्दल बोलायचं झाल्यास, तर प्रत्येक लाभार्थी त्याची प्रतीक्षा करत आहे. 12 व्या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान येणं अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 सप्टेंबर 2022 रोजी 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मात्र, अद्याप अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.