मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Onion Rate : भविष्यात कांद्याचा वांदा होऊ नये म्हणून केंद्राची आतापासूनच तयारी काय आहे पूर्ण योजना?

Onion Rate : भविष्यात कांद्याचा वांदा होऊ नये म्हणून केंद्राची आतापासूनच तयारी काय आहे पूर्ण योजना?

कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे.

कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे.

कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

नवी दिल्ली, 16 जुलै : सध्या देशात कांदाचे दर दरात कोणतीही चढ उतार नसल्याचा अंदाज घेत केंद्र सरकारकडून कांद्याबाबत तयारी सुरू आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असते. या काळात कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जातात. त्यामुळे अनपेक्षितपणे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने कांद्याबाबत संपूर्ण आराखडा तयार केला आहे. कांद्याचे दर कमी असल्याचा फायदा घेत आधीच कांदा खरेदीकरून व्यवस्थित साठवला आहे. (Onion Rate)

सरकारने 2022-23 मध्ये बफर स्टॉक तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 2.5 लाख टन कांदा खरेदी केला आहे आणि कांद्याच्या किरकोळ किमती वाढल्यास हा साठवलेला कांदा पुरवठा करण्याच्या तयारीत केली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी 26.64 दशलक्ष कांदा उत्पादन झाले होते.  यंदा हे उत्पादन 37.17 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असल्याची महिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : पूर्व सूचना देऊनही पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष, संभाजीराजे छत्रपतींची तिव्र नाराजी, विजयदुर्गची तटबंदी ढासळली

कांद्याचा बफर स्टॉक वाढला

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील विक्रम मोडीत काढत केंद्राने 2022-23 या वर्षात बफर स्टॉकसाठी 2.50 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. चालू वर्षातील कांद्याच्या बफर स्टॉक 2021-22 मध्ये तयार केलेल्या 2 लाख टनांपेक्षा 50 हजार टन अधिक आहे.

हा कांदा नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) द्वारे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश सारख्या कांदा उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतकरी उत्पादक संस्थांमार्फत (FPOs) खरेदी केला जातो.

हे ही वाचा : '4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की...'; 'त्या' मुद्द्यावरुन शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

भाव वाढल्यास सरकारकडून कांदा

पुढच्या काही महिन्यात कांद्याचे भाव वाढल्यास केंद्र सरकारकडून साठवलेला कांदा खुल्या बाजारात उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्राकडून विविध राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात टप्प्याटप्प्याने बाजार विक्रीसाठी आणणार असल्याचे नियोजन आहे.

खुल्या बाजारात ज्या राज्यांमध्ये कांद्याचे दर वाढत जातील त्यानुसार साठवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणला जाईल. प्रत्येक वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कांद्याचे भाव वाढत असतात. हा काळ लग्न सराईचा असल्याने काद्याची मागणी कायम राहते आणि पुरवठा कमी होतो. त्यामुळे दर वाढत असतात.

First published:

Tags: Farmer, Onion, Priceonion