Home /News /agriculture /

Nutritious Cereal Foods : पोष्टिक तृणधान्यांच्या शेतीत झाली मोठी घट, राज्य आणि कृषी विभागाला जाग येणार का?

Nutritious Cereal Foods : पोष्टिक तृणधान्यांच्या शेतीत झाली मोठी घट, राज्य आणि कृषी विभागाला जाग येणार का?

संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष जाहीर केल्यामुळे जगभरात तृणधान्ये आणि त्यांच्या पौष्टिकतेविषयी जनजागृती सुरू झाली आहे. (Nutritious cereal foods)

  पुणे 31 मे : सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने लोक पोष्टिक धान्यांचा वापर (Nutritious cereal foods) आपल्या जेवणामध्ये करत नसल्याचे जास्त दिसून येत आहे. याचबरोबर ग्रामीण भागात नाचणी, बाजरी, ज्वारीच्या भाकरी (Nachani, millet, sorghum bread) रोज सकाळी न्याहरीमध्ये घेतल्या जातात यामध्ये पोष्टिकता असल्याने शेतीच्या कामांना ताकत मिळण्यासाठी या तृणधान्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु सध्या ही तृण धान्ये नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (Kolhapur sangli satara pune) जिल्ह्यातील काही भागात नाचणी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या धान्यासह पुढच्या 5 ते 10 वर्षात अन्य धान्ये नामशेष होण्याची भिती कृषी विभागाच्या (agriculture department Maharashtra) तज्ञांनी व्यक्त केली आहे.

  बाजरी, ज्वारी, नाचणी, कोडो, कुटकी, राळा, वरई आदी पौष्टिक तृणधान्ये (Cereals) लागवडीखालील क्षेत्राचा कमालीचा घट झाला आहे. तृणधान्यांच्या पिकाखालील क्षेत्रात 2010-11 तुलनेत 47 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कृषी विभागाचे विस्तार आणि प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2010-11 मध्ये खरीप ज्वारीचे क्षेत्र दहा लाख हेक्टर होते, ते आता दोन लाख हेक्टरवर आले आहे. 

  हे ही वाचा : केरळात Monsoon आलाचं नाही? भारतीय हवामान विभागाच्या दाव्यावर स्कायमेटकडून प्रश्नचिन्ह

  ते म्हणाले कि, रब्बी ज्वारीचे क्षेत्र 30 लाख हेक्टरवरून 13 लाख हेक्टरवर आले आहे. बाजरीचे क्षेत्र 10 लाख हेक्टरवरून 5 लाख हेक्टरवर आले आहे. नाचणीचे क्षेत्र सव्वालाख हेक्टरवरून 75 हजार हेक्टरवर आले आहे. यासह राळा, वरईच्या क्षेत्रातही कमालीची घट झाली आहे. ज्वारी, बाजरी वगळता राज्यात सध्या होणारी सर्व तृणधान्यांची पिके आदिवासी पट्ट्यात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतच होतात. परंतु या भागात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

  देशची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने देशातील जनतेला पुरेसे अन्न मिळण्यासाठी सरकारने गहू आणि तांदळाच्या उत्पादनाकडे जास्त लक्ष दिले. याचबरोबर बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडचा काळ आला. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या तृणधान्यांकडे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकारचेही दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले आहे.

  2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष असणार

  संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष जाहीर केल्यामुळे जगभरात तृणधान्ये आणि त्यांच्या पौष्टिकतेविषयी जनजागृती सुरू झाली आहे. पण तृणधान्यांची मूल्य साखळी विकसित केल्याशिवाय आणि उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ मिळत नाही तोवर तृणधान्यांखालील क्षेत्रात वाढ होणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या शहरी जीवनशैलीमधून निर्माण झालेल्या व्याधींशी लढायचे असेल तर तृणधान्यांना पर्याय नाही, असे संयुक्त राष्ट्रांकडून माहिती देण्यात आली आहे. सरकार, कृषिशास्त्रज्ञांचे लागवडीकडे झालेले दुर्लक्ष, नगदी आणि फळपिकांकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडला आलेले महत्त्व याच्या एकत्रित परिणामामुळे तृणधान्यांची लागवड वेगाने घटत आहे.

  कृषी विभागाकडून तृणधान्य वाढीसाठी उपाययोजना

  तृणधान्यांचे क्षेत्र आणि उत्पादकतावाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तृणधान्यांच्या हमीभावातही वाढ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर तृणधान्यांचे बियाणे आणि लागवडीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासारख्या योजनांच्या माध्यमातून तृणधान्यांचे मूल्यवर्धन केले जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण शाखेचे संचालक विकास पाटील यांनी दिली. हैदराबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलेट रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून तृणधान्यांच्या सर्वागीण विकासासाठी सोलापूर येथे सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्याचा प्रस्ताव असल्याचीही माहिती विकास पाटील यांनी दिली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Kolhapur, Pune (City/Town/Village), Sangli (City/Town/Village)

  पुढील बातम्या