मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Sugarcane Farmer : केंद्राकडून ऊसदराच्या एफआरपीत वाढ, टनाला 3050 रूपये दर देण्याचा निर्णय

Sugarcane Farmer : केंद्राकडून ऊसदराच्या एफआरपीत वाढ, टनाला 3050 रूपये दर देण्याचा निर्णय

मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दर वाढला असला तरी डिझेल आणि रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडेल का याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दर वाढला असला तरी डिझेल आणि रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडेल का याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दर वाढला असला तरी डिझेल आणि रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडेल का याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

  नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : केंद्र सरकारने उसाच्या आगामी ऊस हंगामासाठीचा एफआरपी दर जाहीर केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत केंद्राने टनापाठीमागे 75 रुपये वाढ करत 3050 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळ रिकव्हरीच्या दर गृहीत धरून म्हणजे 10.25 टक्के रिकव्हरीला 3050 रुपये टनापाठीमागे दर वाढणार आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दर वाढला असला तरी डिझेल आणि रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडेल का याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. (Sugarcane Farmer)

  उसाच्या एफआरपी दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या (सीसीईए) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने प्रति क्विंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी निश्चित केला आहे. दरम्यान केंद्राने जाहीर केलेला आतापर्यंतचा हा सर्वाधिक एफआरपी दर असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा होईल असे केंद्राकडून सांगण्यात आले.

  हे ही वाचा : संजय राऊतांना जामीन की कोठडी वाढणार? आज कोर्टात फैसला

  ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या ऊस- साखर वर्षासाठी हा एफआरपी दर दिला जाईल. गेल्या आठ वर्षात एफआरपी दरात 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. एफआरपी दरात यंदा क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ झालेली आहे. मूळ रिकव्हरी दर 10.25 टक्के गृहीत धरून क्विंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी दर दिला जाणार असून प्रत्येक वाढीव 0.1 टक्के रिकव्हरीमागे 3.05 रुपये इतका प्रीमियम अर्थात दरवाढ दिली जाईल. हेच सूत्र मूळ रिकव्हरी दरापेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या उसासाठी वापरले जाईल.

  हे ही वाचा : बीडमध्ये वकील आणि पोलिसांचा वाद चव्हाट्यावर, 200 वकिलांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

  साडेनऊ पेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या क्षेत्रातील उसासाठी हे सूत्र लागू असणार नाही. याठिकाणी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 282.12 रुपये या दराने एफआरपी दिला जाईल. चालू साखर वर्षात हा दर 275.50 रुपये इतका आहे. पुढील साखर वर्षासाठी ऊस उत्पादनाचा क्विंटलमागचा खर्च 162 रुपये इतका गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान 10 लाख टन साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून याबाबतची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Sugar, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

  पुढील बातम्या