मुंबई, 28 जून : राज्यात पावसाला (monsoon update in Maharashtra) सुरूवात झाली आहे कोकणासह (Konkan rain) अन्य जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अद्यापही पुरेसा पाऊस होत नसल्याने काही जिल्ह्यात पेरणीची कामे खोळांबली आहेत. हवामान पोषक असल्याने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागात (Waiting for heavy rain)जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्याने शेतीची (farmer) कामे थांबली आहेत. राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने काही जिल्ह्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.
मागच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीतील राजापूर येथे सर्वाधिक 110 मिलिमीटर तर सिंधुदुर्गमधील देवगड येथे 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली असली तरी, मध्य महाराष्ट्रातील काही भागात अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. याचबरोबर प्रमुख धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. मात्र पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पाऊस कोसळण्याची आवश्यकता आहे.
हे ही वाचा : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई ठाण्यापाठोपाठ पुण्यातही पाणीकपात, दिवसाआड पुरवठ्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने कमी-अधिक हजेरी लावली असली तरी जून महिना उलटत आला तरी अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पाऊस झालेल्या भागात पेरण्याची लगबग सुरू असली तरी, समाधानकारक पाऊस न झालेल्या भागात मात्र पेरण्या अद्यापही खोळंबल्याचे चित्र आहे.
मागच्या 24 तासांतील पाऊस
कोकण : रायगड म्हसळा 54, मुरूड 72, पोलादपूर 31, श्रीवर्धन 45, रत्नागिरी : चिपळूण 81, दापोली 85, गुहागर 81, हर्णे 45, लांजा 120, मुलगुंद 59, राजापूर 130, रत्नागिरी 35, संगमेश्वर 67, वाकवली 41, सिंधुदुर्ग : देवगड 104, कणकवली 85, कुडाळ 79, मुलदे (कृषी) 61, रामेश्वर 58, सावंतवाडी 78, वैभववाडी 47, वेंगुर्ला 47,
मध्य महाराष्ट्र : नगर : संगमनेर 23, शेवगाव 38, कोल्हापूर : चंदगड 48, गगनबावडा 42, पन्हाळा 35, राधानगरी 33, सातारा : महाबळेश्वर 41, सोलापूर : जेऊर 35.
मराठवाडा : लातूर : देवणी 47, लातूर 48, शिरूर अनंतपाळ 42, उदगीर 38. उस्मानाबाद : भूम 57.
विदर्भ गडचिरोली: देसाईगंज 21.
हे ही वाचा : BREAKING : 3 दिवसांमध्ये 160 जीआर, राज्यपालांनी मागितला सरकारकडे खुलासा
मुंबईत करण्यात आलीये पाणीकपात -
मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस प़डला आहे. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत तलावांमध्ये अत्ंयत कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे.
पुण्यातही पाणी कपात
पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच याबाबतचं सविस्तर वृत्त समोर येईल.