जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारची विशेष योजना, महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारची विशेष योजना, महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारची विशेष योजना, महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी कृषी विभाग (agriculture department) आता शेतकऱ्यांना आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत देणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांचे आरोग्याकडे (farmer health) दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी कृषी विभाग (agriculture department) आता शेतकऱ्यांना आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत देणार आहे. यामुळे पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होणार आहे. ‘आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना सन 2022-23’ (Nutritious Safe Food Plan) च्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरले आहे. (Maharashtra)

जाहिरात

लाभार्थ्यांची निवड

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. सुरूवातीला प्रत्येक गावात 10 किट देण्यात येणार आहेत. त्यांनतर टप्प्याटप्प्याने कीट देण्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. डीपीसी, सीएसआर, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, फलोत्पादन विभागाची परसबाग योजना यासाठी उपयोगात आणली जाणार आहे.  

हे ही वाचा :  केंद्र सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात वाढ, नवीन दरात ‘या’ पिकांना झाला फायदा

या योजनेसाठी 50 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून गावातील कुपोषित बालके असलेल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गावातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थी आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट,महिला बचत गटातील असणार आहेत. ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.

बियाणे

भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे बियाण्यांचे किट एक गुंठ्यासाठी पुरेसे असून एका शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज भागू शकणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे बँक तयार करून स्वत: वापरून इतरांनाही बियाणे द्यावयाचे आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी येणाऱ्या बिया पुढच्या वर्षी वापरायचा आहेत. या बियाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असून गुणवत्तेची जबाबदारी महाबीजची असल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात

अशी करावी लागवड

या बियाण्यांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा शक्यतो राहत्या घराजवळ जागा असावी, जणेकरून देखरेख करणे सोईचे होईल. लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करून शेणखत टाकावे. पालेभाज्यांसाठी गादी वाफे तयार करावेत. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजापाल्याचे आहारातील महत्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बीयाणे बँक यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार असल्याची माहिती आत्माचे सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात