मुंबई, 08 जून : मान्सूनची वाटचाल (monsoon update) बंगालच्या उपसागरातून पुढे होत आहे. (Bay of Bengal) सध्या मान्सून तामिळनाडूच्या काही भागात आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. (imd alert) दरम्यान केरळमध्ये मान्सून लवकर (monsoon comes in Kerala) दाखल झाल्याने गोव्याच्या किनापट्टीपासून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु मान्सूनची वाटचालमध्येच थांबल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस आपल्याला वाट पहावी लागणार आहे. (The arrival of monsoon in Maharashtra has been postponed)
गतवर्षीपेक्षा यंदा मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच आला. त्यानंतर दोनच दिवसांत 31 मे मॉन्सूनने संपूर्ण केरळ(Kerala) राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनची वाटचाल होत होती. कारवार, चिकमंगळूरू, बंगळूरू, धर्मापूरीपर्यंतच्या भागात मॉन्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून(Arabian Sea) मॉन्सूनचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे.
हे ही वाचा : पैगंबरांबाबतच्या वक्तव्याचा वाद; अलकायदाची मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत आत्मघाती हल्ल्यांची धमकी
दरम्यान पदुच्चेरी, कराईकलसह तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. ईशान्य भारतातील सिक्कीम तसेच पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ होसाळीकर म्हणाले की, राज्यातील मॉन्सूनचे आगमन फार लांबलेले नाही कोकणात साधारणत: 5 जूननंतर मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर हळूहळू तो महाराष्ट्राच्या विविध भागात दाखल होत असतो. यंदा केरळ आणि कर्नाटकात मॉन्सून लवकर आल्याने महाराष्ट्रातही त्याचे लवकर आगमन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात होती.
हे ही वाचा : हार्टपासून मेंदूपर्यंत कोथिंबीरीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील
मॉन्सूनची प्रगती थांबल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मॉन्सूनचे आगमन खूप लांबलेले नसून, अद्यापही आपण नियमित वेळेच्या जवळच आहोत. शिवाय राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. मॉन्सूनच्या आगमनाविषयी हवामान विभागाकडून माहिती देण्यात येईल.
हवामान अंदाज
मागच्या 24 तासांत पुणे 38.4, धुळे 41.0, जळगाव 43.0, कोल्हापूर 33.7, महाबळेश्वर 30.2, नाशिक 36.8, निफाड 37.2, सांगली 35.9, सातारा 38.9, सोलापूर 41.8 सांताक्रूझ 34.1, डहाणू 34.5, रत्नागिरी 33.8, औरंगाबाद 41.2, परभणी 43.3, नांदेड 41.0, अकोला 44.8, अमरावती 44.2, बुलडाणा 40.0, ब्रह्मपुरी 46.2, चंद्रपूर 35.4, गोंदिया 46.2, नागपूर 45.2, वर्धा 45.0 तापमान होते.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमनही लांबले आहे. साधारणतः ७ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळणार आहे. यातच संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर या भागातही मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे.