जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Strawberry World record : जगात भारी ठरली ही स्ट्रॉबेरी; का आहे खास पाहा VIDEO

Strawberry World record : जगात भारी ठरली ही स्ट्रॉबेरी; का आहे खास पाहा VIDEO

स्ट्रॉबेरी 
संत्र्याप्रमाणे स्ट्रॉबेरी देखील पोट आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला जंतू आणि विषाणूंपासून वाचवतात. शरीरातील पाचक प्रणाली शुद्ध करण्यासाठी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

स्ट्रॉबेरी संत्र्याप्रमाणे स्ट्रॉबेरी देखील पोट आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला जंतू आणि विषाणूंपासून वाचवतात. शरीरातील पाचक प्रणाली शुद्ध करण्यासाठी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जगभरात होतेय या स्ट्रॉबेरीची चर्चा कारण…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी कुणाला आवडणार नाही. अशाच एका स्ट्रॉबेरीची चर्चा सध्या जगभर आहे. या स्ट्रॉबेरीने वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. म्हणजे गिनीज बुकमध्ये या स्ट्रॉबेरीची नोंद झाली आहे (Guinness World Record). ही स्ट्रॉबेरी  जगातील सर्वात भारी स्ट्रॉबेरी ठरली आहे (World’s Biggest Strawberry). आता असं या स्ट्रॉबेरीत नेमकं काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. इज्राइलत्या कदिमा-जोरानमध्ये  (Kadima-Zoran, Israel) राहणारा शेतकरी एरियल चाहीने (Ariel Chahi) अशा स्ट्रॉबेरीची लागवड केली, जिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अगदी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही याची दखल घ्यावी लागली. याचं कारण म्हणजे या स्ट्रॉबेरीचा आकार आणि त्याचं वजन. ही जगातील सर्वात मोठी आणि वजनदार स्ट्रॉबेरी आहे. एरवी तुम्ही आम्ही पाहतो ती स्ट्रॉबेरी कशी हलकीफुलकी, नाजूक असते. पण ही स्ट्रॉबेरी वेगळी आहे. ही जगातील सर्वात मोठी स्ट्रॉबेरी आहे. जिचं वजन तब्बल 289 ग्रॅम आहे. हे वाचा -  मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे 6 पांढरे पदार्थ; शुगर राहील नियंत्रणात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे, ज्यात स्ट्रॉबेरीचं वजन करताना दाखवण्यात आलं आहे. एका आयफोनच्या वजनाची या स्ट्रॉबेरीच्या वजनाची तुलना करण्यात आली. आयफोनचं वजन 194 ग्रॅम होतं.

जाहिरात

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर या स्ट्रॉबेरीबाबत माहिती देण्यात आली आहे. इलान जातीची ही स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी इ द फिल्डमार्फत उगवण्यात आली आहे. हा एरिअलचा कौटुंबिक व्यवसाय आहे. हे वाचा -  Grapes: गोड लागली म्हणून द्राक्षे जास्त खाऊ नका; त्याचे साईड इफेक्ट समजून घ्या याआधी जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरीचा रेकॉर्ड 2015 साली जपानने केला होता. जिचं वजन 250 ग्रॅम होतं. जपानमधील कोजी नाकाओने या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं होतं. या जपानी स्ट्रॉबेरीला अमाऊ म्हटलं जातं. पण या जापनीच स्ट्रॉबेरीपेक्षा इज्राइली स्ट्रॉबेरी अधिक वजनदार निघाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात