मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Video : कोरोनाच्या भीतीनं वाढले लिंबाचे दर? पाहा Ground Report

Video : कोरोनाच्या भीतीनं वाढले लिंबाचे दर? पाहा Ground Report

X
कोरोनापासून

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी रोजच्या जेवणात लिंबाचं सेवन केलं जातं.

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी रोजच्या जेवणात लिंबाचं सेवन केलं जातं.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 2 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका पुन्हा वाढलाय. चीनमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानं मुंबईसह देशभर खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी रोजच्या जेवणात लिंबाचं सेवन केलं जातं. कोरोनाची भीती वाढल्यानं लिंबाचे दर वाढलेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालाय. मुंबईच्या बाजारामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहूया

  लिंबाची आवक कशी आहे?

  सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे त्यामुळे बजारपेठेत लिंब भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. लिंबाचे भाव सुद्धा कमी झाले आहेत. 120 ते 150 रुपये शेकडा प्रमाणे लिंब विकले जाताहेत. राज्यातही आवक असल्यामुळे लिंबाचे भाव वाढलेले  नाहीत. जानेवारी महिन्यानंतर आंध्र प्रदेशातून लिंबाची आवक सुरु झाली की भाव वाढतात, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

  अगदी सोप्या पद्धतीनं घरीच बनवा खान्देशी लांडगे, पाहा Video

  इम्युनिटी बुस्टर म्हणून वापर

  सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. हे शरीरास बर्‍याच रोगांशी लढायला मदत करते. यासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी, 1-2 चमचे ताज्या लिंबाचा रस, एक चतुर्थांश चमचा मीठ आणि एक चतुर्थांश चमचा मध आवश्यक आहे.

  आपल्या शरीरास सर्दी आणि संसर्गापासून वाचण्यास यामुळे मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्या दूर होतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

  First published:

  Tags: Agriculture, Covid-19, Health, Local18