मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Soybean Faming : कृषी विभागाकडून सोयाबीन पेरणीबाबत शेतकऱ्यांना 'या' दिल्या महत्वपूर्ण सूचना

Soybean Faming : कृषी विभागाकडून सोयाबीन पेरणीबाबत शेतकऱ्यांना 'या' दिल्या महत्वपूर्ण सूचना

शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणीसाठी (soybean farming) पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते

शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणीसाठी (soybean farming) पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते

शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणीसाठी (soybean farming) पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 10 जून : यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे (soybean faming) उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोयाबीनला चांगला भावही (soybean rate) मिळत असल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (soybean grower farmer) यंदा सोयाबीन पेरणीची गडबड करण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून पूर्व (pre monsoon rain) पाऊस चांगली होत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते यासाठी कृषी आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये. यासाठी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

हे ही वाचा : Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली, गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल imd कडून माहिती

सोयाबीन बियाणांची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले चांगले बियाणे वापरावे. प्रति हेक्टरी बियाणांचा दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पदध्तीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. 

पेरणीपूर्वी अशी घ्यावी काळजी

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. व नंतर त्यांची पेरणी करावी. तसेच बियाण्यांची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करण्याचे आवाहनही करण्यात देण्यात आले आहे.

हे ही वाचा : BJP आमदाराच्या मुलीनं तोडला सिग्नल, वाहतूक पोलिसाशी हुज्जत; भररस्त्यात केलेली दादागिरी कॅमेऱ्यात कैद

कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून ही सूचना

राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.

या बियाणांचा करा वापर

यंदा सोयाबीनच्या बीजोत्पादन फुले संगम, केडीएस ७५३ (फुले किमया) एमएयूएस. १६२. एमएयूएस - १५८, एमएमएयूएस ७२, एमएयूएस-६१2 जेएस-३३५. डीएस २२८ या वाणांचा समावेश आहे. तूर, मूग, उडीद, ज्यूट आदी पिकांचा मिळून ८३१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून, त्यापासून १० हजार ४५६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे तुरीच्या बीएसएमआर ७३६, बीडीएन ७११. उडदाच्या टीएयू १. मुगाच्या उत्कृष बीएम- २००२-१ बीएम- २००३ २, ज्यूटच्या जेआरओ-५२४ या वाणांचा समावेश आहे. 

First published:

Tags: Agriculture, Farmer, Soyabean rate, Soyabean rate in maharashtra