मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Soybean varieties : पावसापासून बचाव करणाऱ्या सोयाबीनच्या ‘या’ जातींमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा!

Soybean varieties : पावसापासून बचाव करणाऱ्या सोयाबीनच्या ‘या’ जातींमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा!

सोयाबीनच्या जातींचे (Soybean varieties) उत्पादन आणि उगवण क्षमता वेगळी असल्याने शेतकरी (farmer) सोयाबीनच्या जातीची निवड करताना विचार करून करत असतो.

सोयाबीनच्या जातींचे (Soybean varieties) उत्पादन आणि उगवण क्षमता वेगळी असल्याने शेतकरी (farmer) सोयाबीनच्या जातीची निवड करताना विचार करून करत असतो.

सोयाबीनच्या जातींचे (Soybean varieties) उत्पादन आणि उगवण क्षमता वेगळी असल्याने शेतकरी (farmer) सोयाबीनच्या जातीची निवड करताना विचार करून करत असतो.

मुंबई, 20 मे : राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते यासाठी राज्यातील अनेक भागात वेगवेगळ्या सोयाबीनच्या जातींचा वापर केला जातो. सोयाबीनच्या जातींचे (Soybean varieties) उत्पादन आणि उगवण क्षमता वेगळी असल्याने शेतकरी (farmer) सोयाबीनच्या जातीची निवड करताना विचार करून करत असतो. दरम्यान पावसाळी सोयाबीनच्या वाणाची निवड करताना सोयाबीन जास्त पाण्यात कसे टिकेल या वाणाची निवड शेतकरी करत असतो. सोयबीनच्या विवीध जातींचे संशोधन करण्यात आले आहे, याबाबत आपण जाणून घेऊ.

राज्यात सोयाबीन पिक 46 लाख हेक्टर होण्याची शक्यता आहे. या प्रमुख पिकाची उत्पादकता विविध कारणांमुळे देशाच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे. यामुळे सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात कोट्यावधींचा निधी देण्याची मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : heavy rain kolhapur : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सोयाबीनच्या विविध जाती

MAUS - 612 - दर्जेदार बियाणे, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते.

MAUS - 158 - एकरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण, काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी आहे.

MAUS - 162 - सरळ व उंच वाढणारे, तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण, काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण म्हणून ओळख आहे.

DS- 228 फुले कल्याणी राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण आहे. अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणारे वाण. उशिरा येणारे असून पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणीसाठी उपयुक्त.

हे ही वाचा : नागपुरातील धक्कादायक प्रकार, महिला लिपिकाने बँकेला लावला 98 लाखांचा चुना

KDS-344 फुले अग्रणी - राहुरी विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारे सोयाबीन वाण, शेंगा गळत नसल्याने उत्पादन वाढीस उपयुक्त आहे

फुले संगम 726- राहुरी कृषि विद्यापीठाचे आणखीन एक सर्वोधिक एकरी उत्पादन तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, रोगास प्रतिबंधक आहे.

JS-9705- महाराष्ट्र साठी शिफारस, 70-75 दिवसात येणारे, तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते

JS-9305- महाराष्ट्रसाठी शिफारस,अधिक उत्पादनासाठी, रोग व किडीस कमी बळी पडणारे सोयाबीन वाण म्हणून याची ओळख आहे.

सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करा

शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

First published:
top videos

    Tags: Agriculture, Farmer, Soyabean rate