जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Kharif Sowing : मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप पिकाचे क्षेत्र वाढणार, 18 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होणार

Kharif Sowing : मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप पिकाचे क्षेत्र वाढणार, 18 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होणार

Kharif Sowing : मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरीप पिकाचे क्षेत्र वाढणार, 18 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होणार

राज्यात मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोकणातील भाताच्या लावणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. (Kharif Sowing)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : राज्यात मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोकणातील भाताच्या लावणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. (Kharif Sowing) तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऊस आणि सोयाबीन पेरणीच्या हिशोबाने राने तयार केली आहेत. (Sugarcane farmer and rice crop farmer) तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापूस (cotton) आणि सोयाबीनसाठी (soybean) आपल्या जमीनी तयार करून ठेवल्या आहेत. दरम्यान राज्य शासनानेही मान्सूनच्या (monsoon) आगमनापूर्वी बियाणांची व्यवस्थाकरून ठेवल्या आहेत.

जाहिरात

मागच्या वर्षी मान्सूननंतर येणाऱ्या खरीप हंगामात राज्यात जवळजवळ 143लाख हेक्टरच्या पुढे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. यंदाही मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या जादा होण्याची शक्यता शासनाने माहिती दिली आहे. एकूण पेरा 146ते 147 लाख हेक्टरच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वेळेत पुरेशी खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी नियोजन काळजीपूर्वक करावे लागणार असल्याचे कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा :  Sugarcane Farmer : 8 एकर ऊस तोडला जात नसल्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

मॉन्सून वेळेत व पुरेसा होण्याचा अंदाज असल्यामुळे राज्यात यंदा खरिपाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बियाणे कंपन्या (Seed Company) एकूण 18 लाख क्विंटलहून अधिक बियाणे विक्रीला (Seed Sale) आणत आहेत. त्यामुळे बाजारात बियाणे टंचाई (Seed Shortage) भासणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

जाहिरात

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बियाणे बाजारात सध्यात सर्वात जास्त गाजावाजा बीटी कापूस बियाण्यांचा होतो आहे. एक जूनपूर्वी कापूस बियाणे विकण्यास शासनाने बंदी घातली आहे. मात्र, शेतकरी यंदा पेरा वाढविण्याच्या तयारीत असून पूर्वहंगामी लागवडदेखील वाढणार आहे. त्यामुळे एक जूनपूर्वी बियाणे विकण्यास मान्यता मिळण्यासाठी बियाणे विक्रेते, बियाणे कंपन्यांनी जोरदार लॉबिंग चालू केले आहे. दरम्यान या दबावाला बळी पडणार नसल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Monsoon Update : केरळमधील मान्सूनच्या आगमनाची IMD कडून नवी डेटलाइन, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन

असे असेल खरीप बियाणे उपलब्धतेचे नियोजन

एकूण अपेक्षित खरीप पेरा : 146.85 लाख हेक्टर

बियाणे बदलाच्याप्रमाणानुसार बियाण्यांची गरज : 17.95 लाख क्विंटल

गरजेच्या तुलनेत होणारा अपेक्षित पुरवठा : 19.88 लाख क्विंटल

महाबीजकडील बियाणे पुरवठा : 1.72 लाख क्विंटल

खासगी कंपन्यांकडून होणारा पुरवठा : 18.01 लाख क्विंटल

जाहिरात

खासगी कंपन्यांकडून होणारा कापूस बियाणे पुरवठा : 98 हजार 478 क्विंटल

खासगी कंपन्यांकडून होणारा सोयाबीन बियाणे पुरवठा : 12 लाख 65 हजार 823 क्विंटल असे नियोजन असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात