Home /News /agriculture /

Sugarcane Farmer : 8 एकर ऊस तोडला जात नसल्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

Sugarcane Farmer : 8 एकर ऊस तोडला जात नसल्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

राज्यात ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांने (farmer suicide attempt) टोकाचे पाऊल उचलले आहे. (jalna)

पुढे वाचा ...

  जालना, 27 मे : यंदाच्या साखर हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. (sugarcane farmer) कधी अस्मानी संकट तर कधी सरकारची धोरणे तर कधी कारखानदारांचा आडमुठेपणा या सगळ्यात शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. (farmer) बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपला ऊस कारखान्याला जात नसल्याने पेटवून देत आत्महत्या केली. (Beed district farmer suicide) तर सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उसाला काडी लावत ऊस तोडणी करायला आलेल्या मजुरांचा सत्कार केला. दरम्यान पाठोपाठ राज्यात तिसरी घटना समोर आली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (jalna collector office) शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  जालना साखर कारखाना ऊस तोडणी करायला तयार नसल्याने, घनसावंगी तालुक्यातील भोगाव या गावातील शेतकरी पती पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि. 27) कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जालना जिल्ह्यातील कदीम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पती- पत्नीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

  हे ही वाचा : Damini App : काळजी नसावी! वीज कुठे पडणार हे 30 मिनिटं आधी समजणार, राज्य शासनाकडून नवीन Mobile App लाँच

  घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी पती पत्नीने कीटकनाशक हातात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली. सुभाष सराटे आणि मीरा सराटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचे नाव असून, त्यांचा ८ एकर ऊस तोडणीअभावी उभा आहे. बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या करूनही साखर कारखाना ऊस तोड करायला तयार नसल्याचे त्यांचे मत आहे. दरम्यान, त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच किटकनाशकाची बाटली आणून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

  जिल्हाविशेष शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदरील पती-पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषप्राशन करून आत्महत्या करणार आहेत त्यावरून शौकत सय्यद यांनी तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना आणि तालुका जालना पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांच्या फौजफाटा बोलावून पती-पत्नीला ताब्यात घेतले.

  कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मझहर, तालुका पो. ठाण्याचे सहा.पो. निरि. वडते, गांगे, जिल्हा विशेष शाखेचे पो. हेडकाँ. शौकत सय्यद यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती पत्नीला ताब्यात घेतले. त्यांच्या हातातील कीटकनाशकांची बाटली हिसकावून घेतल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. कदीम जालना पोलिसांनी पुढील तपासकामी या पती-पत्नीला तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

  उसाला 200 रुपये अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  राज्यात अद्यापही 13 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक आहे. हा ऊस गाळप होण्यासाठी जून उजाडण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवण्यात येत आहे. परंतु पिकाला तोड येऊपर्यंत शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने उसाला आग लावत आत्महत्या केली. यावर राज्य शासलानाला आता खडबडून जाग आली आहे. 1 मे नंतर गाळप होणाऱ्या उसाला 200 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घेण्यात आला.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Suicide attempt

  पुढील बातम्या