मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात 42 कारखान्यांचा हंगाम संपला तरी लाखो टन ऊस शिल्लक

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात 42 कारखान्यांचा हंगाम संपला तरी लाखो टन ऊस शिल्लक

राज्याचा साखर हंगाम (sugar season) अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने (sugar factory)अद्याप सुरू आहेत.

राज्याचा साखर हंगाम (sugar season) अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने (sugar factory)अद्याप सुरू आहेत.

राज्याचा साखर हंगाम (sugar season) अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने (sugar factory)अद्याप सुरू आहेत.

  औरंगाबाद, 08 जून : यंदा राज्याचा साखर हंगाम (sugar season) अद्यापही सुरू आहे. राज्यातील उस्मानाबाद, मराठवाडा, आणि विदर्भातील काही साखर कारखाने  (sugar factory)अद्याप सुरू आहेत. दरम्यान यंदा साखर हंगामातील गाळप मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाल्याने उत्पादन वाढणार आहे. (sugarcane farmerमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील साठ कारखान्यापैकी 42 कारखान्यांचा हंगाम 2 जूनपूर्वीच संपला आहे. (Marathwada sugar factories) मराठवाड्यातील कारखान्यांनी तीन कोटी 21 लाख 9 हजार 21 टन उसाच्या गाळपातून 3 कोटी 20 लाख 75 हजार 549 क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी अॅग्रोवला बोलताना दिली.

  हे ही वाचा : MH BOARD 12TH RESULT: लगेच इथे भरा रोल नंबर आणि क्षणात मिळवा निकाल

  उस्मानाबादमधील कारखान्यांनी 70 लाख 21 हजार 949 टन उसाचे गाळप करत सरासरी 9.60 टक्के साखर उताऱ्याने 67 लाख 39 हजार 864 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी 28 लाख 28 हजार 733 टन गाळप करत सरासरी 10.45 टक्के साखर उताऱ्यांने 29 लाख 53 हजार 716 क्विंटल साखर उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील कारखान्यांनी 27 लाख 47 हजार 446 टन गाळप करत 29 लाख 1 हजार 400 क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10.58 टक्के राहिला 

  बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी 45 लाख 99 हजार गाळप केले तर परभणी जिल्ह्यातील कारखान्यांनी 40 लाख 14 हजार 15 टन गाळप करताना सरासरी 10.35 टक्के साखर उताऱ्याने 41 लाख 52 हजार 700 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी 21 लाख 42 हजार 228 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.55 टक्के साखर उताऱ्याने 22 लाख 60 हजार 670 क्विंटल साखर उत्पादन केले. नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांनी 25 लाख 30 हजार 282 टन उसाचे गाळप करत 24 लाख 76 हजार 810 क्विंटल साखर उत्पादन केले.

  हे ही वाचा : MH BOARD 12TH RESULT: यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी; कोणाचा किती टक्के लागला निकाल; इथे बघा

  मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील सर्व अकरा कारखान्यांचा हंगाम संपला आहे. तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील 5, परभणीतील 5, बीडमधील 4, जालन्यातील 1, औरंगाबादमधील 5 व उस्मानाबादमधील सर्वाधिक 11 कारखान्यांनी दोन जून पूर्वी आपले गाळप थांबविले आहे.

  साताऱ्यातील शेतकऱ्यांने दिला ऊस पेटवून

  साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप करत दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण देत ऊस तोडण्यासाठी नकार दिल्याने त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला.

  गेली 20 महिने ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप गाळप न झाल्याने ऊसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. ऊस तोडीचे योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. दरम्यान बर्गे यांनी राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Marathwada, Sugar, Sugar facrtory, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production

  पुढील बातम्या