मराठी बातम्या /बातम्या /Viral /

झोमॅटोचा झोल! 1 हजाराचं जेवण 300 रुपयात, एजंट-ग्राहकांच्या जुगाडामुळे कंपनी हैराण!

झोमॅटोचा झोल! 1 हजाराचं जेवण 300 रुपयात, एजंट-ग्राहकांच्या जुगाडामुळे कंपनी हैराण!

भारतामध्ये फूड डिलिव्हरी ऍपवरून जेवण ऑर्डर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, यामध्ये तरुणांचा वाटा मोठा आहे. पण याच तरुणांमुळे झोमॅटोला मोठ्या प्रमाणावर चुना लागत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 जानेवारी : भारतामध्ये फूड डिलिव्हरी ऍपवरून जेवण ऑर्डर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, यामध्ये तरुणांचा वाटा मोठा आहे. पण याच तरुणांमुळे झोमॅटोला मोठ्या प्रमाणावर चुना लागत आहे. 1 हजार रुपयांचं जेवण 300 रुपयांना जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी एजंटने आपल्याला अशी ऑफर दिल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. यानंतर अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

एका ग्राहकाने लिंक्डइन पोस्टमध्ये त्याच्या आणि झोमॅटो डिलिव्हरी एजंटच्या संवादाची माहिती दिली आहे. विनय सती नावाच्या या व्यक्तीने झोमॅटोमध्ये सुरू असलेल्या या स्कॅमबाबत सांगितलं. डिलिव्हरी एजंटने आपल्याला यापुढे ऑर्डर करताना ऑनलाईन पेमेंट करू नका, असं सांगितल्याचा दावा विनय सती यांनी केला आहे.

डिलिव्हरी एजंटने सांगितलेल्या त्या ट्रिकने आपल्याला धक्का बसल्याचंही विनय सती म्हणाले आहेत. 700-800 रुपयांचं जेवण ऑर्डर करताना कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलं तर तुम्हाला फक्त 200 रुपये द्यावे लागतील, असं डिलिव्हरी एजंटने सांगितल्याचं विनय सती त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

'झोमॅटोवरून मी ऑनलाईन बर्गर ऑर्डर केलं, यासाठी मी ऑनलाईन पेमेंट केलं. 30-40 मिनिटांनंतर डिलिव्हरी एजंट बर्गर घेऊन आला, तेव्हा त्याने पुढच्या वेळी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवा, कारण तुम्ही 700-800 रुपयाचं जेवण ऑर्डर केलं तर तुम्हाला फक्त 200 रुपये द्यावे लागतील. तुम्ही जेवण घेतलं नाही हे मी झोमॅटोला दाखवीन, पण तुम्हाला जेवण देईन. तुम्ही मला फक्त 200 रुपये, 300 रुपये द्या आणि 1 हजार रुपयाचं जेवण घ्या, असं डिलिव्हरी एजंटने सांगितलं,' असं विनय सती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं.

लिंक्डइनच्या या पोस्टला 600 पेक्षा जास्त रिएक्शन आल्या आहेत तर 18 वेळा हे रिपोस्ट करण्यात आलं आहे. एवढच नाही तर झोमॅटोचे सीईओ दिपेंदर गोयल यांनीही याकडे लक्ष दिलं. आम्हालाही याबाबत माहिती आहे, यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असं झोमॅटोचे सीईओ म्हणाले आहेत.

First published:

Tags: Zomato