नवी दिल्ली, 4 जुलै : साप कधी कुठे निघेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात सापाविषयी खूप भिती आहे. साप निघाल्यावर लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण सर्पमित्राला त्यांना पकडण्यासाठी बोलवतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक तरुण झाडूच्या सहाय्याने सापाला पकडत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. तरुण झाडू घेऊन सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो मात्र पुढे साप जे करु लागतो आणि त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांची जी फजिती होते हे पाहून हसू आवरत नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक मुलगा कालव्याच्या काठावर झाडू घेऊन साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आपण पाहू शकता की साप जरी लहान असला तरी तो खूप लवकर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पुढच्याच क्षणी जेव्हा त्या मुलाने सापाला झाडू लावला तेव्हा साप उड्या मारायला लागतो. तर तो साप पुढच्याच क्षणी उडी मारुन दुसऱ्याच्या अंगावर उडी मारतो. तोही घाबरुन सापाला बाजुला सारतो. हे दृश्य शूट करणाराही यावेळी खूप घाबरलेला दिसतोय. त्यामुळे कॅमेरा जास्त प्रमाणात हालत आहे.
@sonyboy1931 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. लोक अनेक कमेंटही करत आहेत. दरम्यान, साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याच्यासोबत मजामस्ती करणं कधी कधी अंगलट येतं. त्याच्या हल्ल्यात वाचणंही एकतर अवघड असतं.