जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : स्टेजवर वधू वराच्या समोर तरुणाचा स्टंट, थोड्याच वेळात तोंडावर आपटला

Viral Video : स्टेजवर वधू वराच्या समोर तरुणाचा स्टंट, थोड्याच वेळात तोंडावर आपटला

 स्टेजवर वधू वराच्या समोर तरुणाचा स्टंट

स्टेजवर वधू वराच्या समोर तरुणाचा स्टंट

लग्नाचा सीझन सुरु आहे आणि सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. लग्नाच्या अनेक निरनिराळ्या घटना सध्या समोर येत आहेत. अनेकजण लग्नांमध्ये हटके गोष्टी करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : लग्नाचा सीझन सुरु आहे आणि सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. लग्नाच्या अनेक निरनिराळ्या घटना सध्या समोर येत आहेत. अनेकजण लग्नांमध्ये हटके गोष्टी करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. असे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तरुण स्टंट करताना दिसतोय. मात्र त्याचा स्टंट फसतो आणि त्याच्यासोबच नको तेच घडतं. लग्नामध्ये एक तरुण वधू वरांसमोर स्टंट दाखवताना व्हिडीओ समोर आलाय. मात्र तरुणाचा स्टंट फसतो आणि तो स्टेजवरच जोरात आपटतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये लग्न समारंभ सुरु असलेला दिसत आहे. स्टेजरवर वधू वरासह बाकीचे नातेवाईकही उभे आहेत. एक तरुण वधू-वरांसमोर बॅक फ्लिप स्टंट करुन दाखवत आहे. पण तो हे स्टंट करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि खाली पडतो. ज्यामुळे तो खजिल झाला आणि उठून त्याने वधू वराला गिफ्ट दिलं. लोकांसमोर असं पडणं तरुणाला लाजिरवाणं वाटलं.

जाहिरात

@bihari.broo नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर सध्या जोरदार कमेंट येताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. दरम्यान, लग्नातील अशा मजेशीर, विचित्र, धोकादायक घटना सोशल मीडियावर समोर येत राहतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतानात दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात