नवी दिल्ली, 28 डिसेंबर : हुंडा ही आपल्या समाजातील एक वाईट प्रथा आहे. देशात हुंडाविरोधी कायदा आहे, शिवाय अनेक वर्षांपासून ही कुप्रथा संपवण्याबद्दल बोललं जातंय, पण अजूनही ती प्रथा समाजात कायम आहे. आता समाजात थेट हुंडा न घेता मुलीवर असलेल्या प्रेमाची भेट म्हणून तिच्या पालकांकडून हुंडा मागितला जातो. पण उत्तर प्रदेशातील एका मुलाने अभिनेत्री दिशा पटानीचा फोटो दाखवून आपल्या आजीला हुंडा न घेण्यास पटवलं. होय, ‘आम्ही हुंडा घेणार नाही…’ असं म्हणणाऱ्या एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओतील संवाद भोजपुरी भाषेत आहे. या संदर्भात ‘एनडीटीव्ही’ ने वृत्त दिलंय. शाश्वत सिंह नावाच्या व्हिडिओ क्रिएटरने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणाऱ्या शाश्वतच्या या व्हिडिओमध्ये त्याची आजी आणि आई दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला, शाश्वत त्याच्या आजीला दिशा पटानीच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून तिचा एक अतिशय बोल्ड फोटो दाखवतो. फोटो दाखवल्यानंतर तो आजीला म्हणतो, ‘आजी, तुला एका मुलीचा फोटो दाखवतो, बघ तिची फॅशन…’ यावर आजी हा फोटो काळजीपूर्वक बघून तोंड फिरवते. नंतर शाश्वत तिला समजावतो की ‘त्यात काय चुकीचं आहे, ती चांगली आहे, ती मुंबईची मॉडेल आहे आणि भरपूर पैसे कमवते.’
हे ऐकून आजी म्हणते, ‘नाही, आम्हाला पैसे नको होते. तिचे कपडे पाहा. आम्हाला कुटुंबात राहिल अशी मुलगी हवी आहे…’ तसेच ती पुढे म्हणते, ‘फोटो तुझ्या आईला दाखव आधी’ त्यावर मुलगा म्हणतो की त्याने त्याच्या आईला फोटो दाखवलाय आणि तिला ती मुलगी आवडली आहे. यात चुकीचं काय आहे, तिने फुल पँटही घातली आहे. बघ तर. इतक्यात शाश्वतची आई येऊन म्हणते, ‘ही सून आली तर आजी तिला हाकलून देईल.’ नंतर शाश्वत आजीला समजावतो, ‘अरे ती हुंडाही आणणार’, तर आजी म्हणते, ‘नाही, आम्ही नाही. हुंडा नाही घेणार भाऊ…’ आजी आणि नातवाचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेक सेलिब्रिटीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री कृतिका सेंगरनेही कमेंट केली आहे. तसंच अनेक जण आजीच्या प्रतिक्रियेचे कौतुकही करत आहेत. दिशा पटानी सध्या तिच्या जिम ट्रेनरबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघंही एकमेकांबरोबर वेळ घालवताना आणि फोटो शेअर करताना दिसत आहेत. दोघांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.