नवी दिल्ली, 9 मार्च: स्वयंघोषित धर्मगुरू आणि बलात्कार प्रकरणातला फरार आरोपी नित्यानंद स्वामीने इक्वेडोरजवळ एक बेट विकत घेऊन ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा (यूएसके)’ हा स्वतंत्र देश स्थापन केलाय. कोणीही जगातल्या कोणत्याही भागात बेट खरेदी करू शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का? अर्थात पैसे असतील तर तुम्ही स्वतःचे बेट विकत घेऊ शकता. जगभरात बेटांची खरेदी-विक्री केली जात आहे. काही ठिकाणी भाडेतत्त्वावरही बेटं दिली जातात. बेट खरेदी करणं म्हणजे घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासारखंच आहे; पण त्याची किंमतदेखील बेटाचं स्थान नेमकं कुठे आहे, त्यावर ठरते. खरं तर, एखादं बेट विकत घेणं आपल्याला वाटतं तितकं महाग नाही. 1 लाख डॉलर्स म्हणजेच 72 लाख रुपयांनाही बेट उपलब्ध आहे. सहसा श्रीमंत व्यक्ती सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी निर्जन आणि दुर्गम बेट खरेदी करतात. ही त्यांची खासगी मालमत्ता असते, ती त्यांच्या सोयीनुसार वापरू शकतात. बेटाच्या किमती स्थानानुसार बदलतात. उदाहरणार्थ, मध्य अमेरिकेत बेटं स्वस्तात उपलब्ध आहेत, तर युरोपमध्ये त्यांच्या किमती जास्त असतात. बहामास आणि फ्रेंच पॉलिनेशियासारख्या भागात बेट विकत घेणं सोपं नाही. अधिक सुविधाजन्य असल्यानं, त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. हेही वाचा - वधू वरांच्या ‘या’ Video ने वेधलं लक्ष, तुम्हीही पाहून कराल कौतुक लंडनमधल्या एका बेटाची सरासरी किंमत साडेसात लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 5 कोटी 36 लाख रुपये आहे. मॅनहॅटन अधिक महाग आहे. तिथे बेटाची किंमत 9 लाख 70 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 6 कोटी 93 लाख रुपये आहे. बेट खरेदी करतानाही सौदेबाजी होते. काही वेळा किंमत चांगली असेल तर स्वस्तातही बेट विकत घेऊ शकता. मध्य अमेरिका, स्कॉटलंड, आयर्लंड, स्वीडन आणि कॅनडामध्ये सर्वोत्तम सौदे उपलब्ध आहेत. रिअॅलिटी क्षेत्राप्रमाणेच बेटांची विक्री आणि खरेदीमध्येही दलाल आहेत. कधीकधी बेटाची किंमत 5 मिलियन डॉलर इतकी महाग असू शकते. अनेक जण सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी बेटं खरेदी करतात. ती फार मोठी नसतात. यामध्ये छोटं घर बांधता येतं. आजूबाजूचा परिसर इच्छेनुसार सजवता येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरव्यागार क्षेत्रात त्रास देणारं कोणी नसतं. बऱ्याच श्रीमंत व्यक्ती महागडं बेट विकत घेऊन आपल्या इच्छेनुसार ते विकसित करतात. बेट विकत घेणे फार कठीण नाही. नोव्हा स्कॉशियामध्ये एका जर्मन नागरिकाने 16 एकरांचं बेट विकत घेतलं होतं. त्याची किंमत 60 हजार डॉलर्स होती. त्या बेटावर मेंढ्यांशिवाय काहीच नव्हतं. अनेक कंपन्या बेटांची ऑनलाइन विक्री करतात. यामध्ये बेटाच्या फोटोंसह त्याची सर्व माहिती देण्यात येते. बरीच बेटं इतकी सुविधासंपन्न आहेत की, फक्त तिथे जायचं बाकी असतं, बाकीच्या सर्व सुविधा तिथे आहेत. वीज पुरवठ्यापासून ते सर्व सुविधांची व्यवस्था तिथे असते.
सध्या, थायलंडजवळचं रंगाई बेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 16 कोटी यूएस डॉलर ठेवण्यात आलीय. हे फुकेत बेटाच्या पूर्वेस स्थित आहे. हा परिसर पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या भागातलं हे सर्वांत मोठं बेट आहे, त्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे. 110 एकरमध्ये पसरलेल्या रंगाई बेटावर वीजपुरवठ्यापासून ते मोबाईल सिग्नलपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे बेट फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. जवळच्या शहरापासून फक्त 10 मिनिटांत बोटीने तिथे जाता येतं. पॅट्रोक्लसही असंच एक बेट आहे. युरोपातलं हे बेट विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. खरेदीच्या व्यवहारावेळी बेटाची किंमत निगोशिएबल अर्थात कमी-जास्त होऊ शकते. 643 एकरांवर पसरलेले पॅट्रोक्लस बेट अथेन्सच्या जवळ आहे. तिथे शेतीयोग्य जमीनही आहे. ऑलिव्ह आणि पाइनसह इतर 5 हजारांहून अधिक झाडं आहेत. तिथलं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं. भारतात तीन जणांकडे आहे स्वतःचं बेट अनेक हॉलिवूड सेलेब्रिटीजची स्वतःची खासगी बेटे आहेत. बॉलिवूड स्टार शाहरूख खान, मिका आणि जॅकलीन फर्नांडिस या तीन जणांकडे स्वतःची बेटं आहेत. शाहरुखने दुबईजवळ एक खासगी बेट 700 मिलियन डॉलर्सना विकत घेतलं आहे.