मुंबई, 06 नोव्हेंबर : भारतात WWF खूप लोकप्रिय आहे. अनेकदा माणसांमध्ये झालेले WWF सारख्या वादाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अनेकवेळा प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केले जातात, परंतु यावेळी व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे. याचं कारण म्हणजे एका दुकानात चक्क दोन उंदीर उपापसात भिडले आहेत. त्यांच्यातील कुस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शुक्रवारी सकाळी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ एका दुकानातील आहे. सामानाच्या स्टँडवर चढून दोन उंदीर आपापसात कुस्ती करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर दुकानातील एकानं ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे काही तासांत हा व्हिडिओ 28 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी पाहिला आहे. अधिकाऱ्यानं ट्वीट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 'नेक टू नेक' फायटिंग चालू आहे. एका युझरनं म्हटले की हा ट्रम्प वि बायडेन आहे, तर कोणी म्हणाले की रेफरीची कमतरता आहे. इतकेच नाही तर काही वापरकर्त्यांनी पती-पत्नीच्या नात्याशीही याचा संबंध जोडला आणि म्हणाले, 'करवा चौथ संपला, कार्यक्रम सुरू झाला.'