जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिला ढेकरमधून कमावतेय कोट्यवधी रुपये, म्हणाली 'लोकांच्या विनंतीनुसार...'

महिला ढेकरमधून कमावतेय कोट्यवधी रुपये, म्हणाली 'लोकांच्या विनंतीनुसार...'

महिला ढेकरमधून कमावते कोट्यवधी

महिला ढेकरमधून कमावते कोट्यवधी

लोक पैसे कमावण्यासाठी अनेक वेगवेगळे व्यवसाय करत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टींचा व्यवसाय करुन लोक पैसै कमावतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 एप्रिल : लोक पैसे कमावण्यासाठी अनेक वेगवेगळे व्यवसाय करत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टींचा व्यवसाय करुन लोक पैसै कमावतात. सोशल मीडियावर अशा विचित्र प्रकारच्या घटना कायमच समोर येत असतात. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या घटनेत एका महिलेनं दावा केला आहे की, ढेकरमधून कोट्यवधींची कमाई करते. हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. ढेकरमधून पैसै कमावणाऱ्या तरुणीचं नाव रेबेको ब्लू आहे. रेबेकोनं दावा केला आहे की, ती व्यक्तींच्या विचित्र कल्पनांसाठी तिच्या ढेकरचे पॉकेट विकते. यातून ती सुमारे 8000 रुपये कमावते. NeedToKnow.Online या वेबसाइटला रेबेकोने याविषयी सांगितलं.

News18लोकमत
News18लोकमत

ही एक विचित्र विनंती आहे परंतु मी माझ्या ग्राहकांच्या अद्वितीय कल्पनांसाठी ही सेवा प्रदान करते. टिकटॉकवर ब्लूचे 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती म्हणाली मी जेव्हापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले तेव्हापासून बर्प कंटेट बनवत आहेत. 2022 मध्ये तिला हे बनवण्यासाठी अधिक विनंत्या येऊ लागल्या. लोकांना या गोष्टी संतुष्ट करत असल्यामुळे लोक मला याविषयी विनंती करतात. त्यामुळे मी चाहत्यांसाठी याचे व्हिडीओ शेअर करत असते. ढेकर जेवढा मोठा आणि लांब असेल तेवढे जास्त त्यातून पैसै कमवू शकतो. दरम्यान, रबेको ब्लू चाहत्यांच्या विनंतीनुसार ढेकरचे व्हिडीओ शेअर करते. अनेकजण तिला पोटावर हात फिरवताना ढेकर देण्याची विनंती करतात. ढेकर देण्याच्या प्रक्रियेमुळे तिच्या शरीरावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचेही सल्ले घ्यावे लागतात. यापूर्वीही अशा विचित्र घटना समोर आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात