नवी दिल्ली, 4 मार्च : संपूर्ण जगभरात अनेक निरनिराळ्या परंपरा आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट, नवीन परंपरा, नवीन पद्धत, कायदे पहायला मिळणार. आपण विचारही करु शकत नाही अशा परंपरा, कायदे असतात. अशातच एका ठिकाणी महिलांना अंडरगारमेंटचे मॉडेलिंग करण्यास बंदी घातल्याचं समोर आलं आहे. याची चर्चा सध्या सर्वत्र पहायला मिळतेय. चीनमध्ये महिलांना अंतर्वस्त्र मॉडेलिंग करण्यावर बंदी घातली असून, त्यानंतर तेथे विचित्र दृश्य पाहायला मिळत आहेत. येथे आता महिलांचे अंतर्वस्त्र परिधान केलेल्या पुरुष मॉडेल्स पाहायला मिळत आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत. हेही वाचा - Scary Video : शोरुमबाहेरील ट्रॅक्टर अचानक झाला सुरु, काच फोडून आत आला आणि…. चीनने अंडरगारमेंट परिधान केलेल्या महिला मॉडेल्सच्या ऑनलाइन जाहिराती प्रदर्शित करण्यावर बंदी घातली आहे. आता अशा परिस्थितीत महिला अंडरगारमेंट विकणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यात अडचणी येत होत्या. या चिनी बंदीला प्रतिसाद म्हणून, चीनी लाइव्हस्ट्रीम फॅशन कंपन्यांनी त्यांच्या व्हिडिओंमध्ये पुरुष मॉडेल्सना अंतर्वस्त्रांची जाहिरात करताना दाखवण्याचा विचार केला आणि नंतर पुरुष मॉडेल अंतर्वस्त्र परिधान करताना करत जाहिरात करताना दिसून आले.
विविध चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुरुष मॉडेल्स विविध प्रकारचे अंतर्वस्त्र परिधान करताना पहायला मिळाले. अनेक पुरुष मॉडेल्स महिलांच्या टाईट-फिटिंग अंडरगारमेंट्स आणि रिबनसह नाइटगाऊन परिधान करताना दिसून आले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, चीनने महिला मॉडेलिंगच्या अंतर्वस्त्रांच्या लाइव्ह स्ट्रीमच्या ऑनलाइन अश्लील सामग्रीचा प्रसार करण्याविरुद्ध कायदा आणला आहे, परिणामी कोणतीही महिला मॉडेल येथे अंतर्वस्त्र परिधान करून जाहिरात करू शकत नाही.

)







