जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलेच्या नाकावर आहे विचित्र जन्मखूण, करावा लागतो ट्रोलिंगचा सामना

महिलेच्या नाकावर आहे विचित्र जन्मखूण, करावा लागतो ट्रोलिंगचा सामना

महिलेच्या नाकावर आहे विचित्र जन्मखूण, करावा लागतो ट्रोलिंगचा सामना

व्यक्तीच्या शरीरावर जन्मखूण (Birth Marks) असणं ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. शरीरावर एखाद्या विचित्र ठिकाणी जन्मखूण असेल तर ती त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणी बाब ठरू शकते. नाकावर जन्मखूण असल्यानं एका महिलेच्या नाकाची तुलना हरणाच्या नाकाशी करून तिला ट्रोल (Troll) केलं जात आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 4 डिसेंबर : व्यक्तीच्या शरीरावर जन्मखूण (Birth Marks) असणं ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. विशिष्ट अशा जन्मखुणेला काही विशिष्ट गोष्टींचं लक्षणही मानलं जातं. जन्मखूण व्यक्तीच्या हातावर, चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकते. त्वचेच्या रंगाच्या तुलनेत जन्मखूण अधिक ठळक असल्याने ती पाहताक्षणी नजरेत भरते. त्यामुळे शरीरावर एखाद्या विचित्र ठिकाणी जन्मखूण असेल तर ती त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणी बाब ठरू शकते. नाकावर जन्मखूण असल्यानं एका महिलेच्या नाकाची तुलना हरणाच्या नाकाशी करून तिला ट्रोल (Troll) केलं जात आहे. एका बाजूला ट्रोलिंग होत असलं तरी दुसऱ्या बाजूला या महिलेचं कौतुकदेखील काही जण करत आहेत. रेवन (Revan) नावाची महिला टिक टॉकवर (TikTok) तिच्या वैशिष्ट्यपूर्ण नाकासाठी प्रसिद्ध आहे. डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, या महिलेच्या नाकाच्या टोकावर तपकिरी रंगाची एक जन्मखूण आहे. ही जन्मखूण पाहिल्यावर तिला नाक बसवलं आहे का, असा प्रश्न पडतो. बरेच जण तिची तुलना `बांबी` या हरणाच्या (Deer) पाडसाशी करतात. बांबी ही हरणावर आधारित एक कार्टून फिल्म (Cartoon Film) आहे. woman birthmark on nose 1 रेवन करते जन्मखुणेवर प्रेम खरं तर रेवन खूप लोकप्रिय आहे. बरेच जण तिला ट्रोल करतात आणि तिच्या नाकाची खिल्ली उडवतात. परंतु, रेवन अशा व्यक्तींवर अजिबात नाराज होत नाही. रेवन नेहमीच सकारात्मक विचार करते. नुकताच रेवनने एक व्हिडिओ (Video) शेअर केला. ‘मी माझ्या नाकावर कधीच शस्त्रक्रिया करणार नाही. कारण माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे आणि नाकावरची जन्मखूण मला खूप आवडते,’ असं ती या व्हिडीओतून सांगते. ‘मी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसते आणि ही गोष्ट मला खूप आवडते,’ असंही ती स्पष्ट करते. `प्रत्येक माणसात अनेक गोष्टी असतात. त्या नुसत्या डोळ्यानं दिसू शकत नाहीत,` असं रेवन म्हणते. एकीकडे काही जण तिला ट्रोल करतात, तर दुसरीकडे काही जण तिचं कौतुकदेखील करतात. काही जण तिला `क्यूट` असंही म्हणतात. हरणासारखं दिसणं ही काही वाईट गोष्ट नाही. ‘तू बांबी हरणासारखी सुंदर आहेस,’ असंही काही जण प्रतिक्रिया देताना म्हणतात. ‘तुमची जन्मखूण खरंच खूप सुंदर आहे,’ असं एका व्यक्तीनं व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात