जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : परफेक्ट फिगरसाठी महिलेनं केलं ऑपरेशन; नंतर घडलं धक्कादायक, झाली अशी अवस्था

Viral News : परफेक्ट फिगरसाठी महिलेनं केलं ऑपरेशन; नंतर घडलं धक्कादायक, झाली अशी अवस्था

परफेक्ट फिगरसाठी महिलेने केले ऑपरेशन

परफेक्ट फिगरसाठी महिलेने केले ऑपरेशन

आजकाल लोक आपल्या फिटनेसच्या बाबतीत जास्तच चिंतेत असतात. धकाधकीच्या जीवनात ते आपल्या फीटनेससाठी वेळ काढतात. स्वतःला फीट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जून : आजकाल लोक आपल्या फिटनेसच्या बाबतीत जास्तच चिंतेत असतात. धकाधकीच्या जीवनात ते आपल्या फीटनेससाठी वेळ काढतात. स्वतःला फीट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतात. जसं की, व्यायाम, जीम, हेल्थी डाएट. आत्तापर्यंत फीटनेसच्या बाबतीतच्या खूप घटना समोर आल्या आहेत. नुकतीच आणखी एक घटना समोर आली असून यामध्ये महिलेनं वजन कमी करण्यासाठी जे केलं ते वाचून आणि त्याचा परिणाम जाणून थक्क व्हाल. बॉडी शेमिंगच्या भीतीने अनेकजण आपलं वजन कमी करतात. नुकत्याचं समोर आलेल्या घटनेतही महिलेनं वजन कमी करण्याच्या आणि फिगर दाखवण्याच्या चक्करमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घातला. या महिलेनं स्वतः ही घटना शेअर केली.

News18लोकमत
News18लोकमत

एका महिला आई बनली. आई झाल्यानंतर तिच्या शरीराचा आकार बदलला. तीच्या शरिराची चरबी वाढली. त्यामुळे तिच्या फिगरमुळे समाधानी नव्हती. Maisie Smith नावाच्या या महिलेने Türkiye येथे जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली. या शस्त्रक्रियेद्वारे मेस्सीने पाच किलो वजन कमी केले. तसेच गर्भधारणेमुळे तिच्या स्तनातील बदल दुरुस्त केले. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिला वेदना होऊ लागल्या. मेस्सीने ही शस्त्रक्रिया आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मेस्सीला अनेक दिवस हा त्रास सहन करावा लागला.

News18

मॅसीने सोशल मीडियावर आपल्या वेदना शेअर केल्या आणि व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये मॅसीने या मेकओव्हर सर्जरीचे सत्य लोकांना सांगितले. हॉस्पिटलच्या बेडवर पडून तिने हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये मेस्सीने सांगितले की, ती रडूही शकत नाही. ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. आता पोटाचा स्फोट होईल असे वाटत आहे. डॉक्टरांनी तिची सैल त्वचा कापून वेगळी केली. दरम्यान, एका आठवड्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ती घरी परतली. आता इतक्या दिवसांनी मॅसीच्या वेदना कमी झाल्या आहे. मात्र तिने आपल्या महिलांना नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचे आवाहन केले. ही प्रक्रिया खूप वेदनादायक असल्याचं तिनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात