नवी दिल्ली, 30 जानेवारी : ‘लग्न’ याविषयी तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. प्रत्येकाला आपलं लग्न काही खास, वेगळं आणि हटके असावं असं वाटतं. यासाठी लोक अनेक मेहनतही घेतात. सोशल मीडियावरही अनेक हटके, विचित्र आणि आश्चर्यचकित करणारे लग्नाचे समारंभ पहायला मिळतात. अशा वेगळ्या आणि हटके लग्नाची चर्चा तर होतेच. अशातच यामध्ये आणखी एका आगळ्यावेगळ्या लग्नाची भर पडली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सध्या समोर आलेल्या हटके लग्नाविषयी ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल. अमेरिकेच्या एका महिलेने चक्क रंगासोबत लग्न केलं आहे. महिलेने गुलाबी रंगासोबत लग्न केलं आहे. हे ऐकून कदाचित तुमच्या कानावर आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही मात्र ही घटना खरी आहे. हेही वाचा - लपाछपी खेळत दुसऱ्याच देशात पोहचला मुलगा, 6 दिवसांनी सापडला अशा अवस्थेत
अमेरिकेतील लास वेगास मधील किटनमध्ये सीरा नावाच्या महिलेनं चक्क गुलाबी रंगासोबत लग्न केलं आहे. तिच्या लग्नसोहळ्यात सर्व काही गुलाबी होतं. लग्नासाठी आलेल्या पाहुण्या मंडळींनीदेखील कपडे गुलाबी रंगाच्या परिधान केली होती. सिराने सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत गुलाबी रंगाबरोबर लग्न केलं. या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पहायला मिळतंय की, सीरा गुलाबी रंगाचे कपडे घालून गुलाबी रंगाच्या गाडीवर बसली आहे आणि गाडीवर गुलाबी रंगाचा केक आहे. सीरा 40 वर्षांहून अधिक काळ गुलाबी रंगाच्या रिलेशनशिपमध्ये होती. ती गुलाबी रंगाच्या सर्व शेडचे कपडे घालत होती. आणि तिला गुलाबी रंगाचे सर्व शेड्स खूप आवडतात.
सीराला दोन वर्षापूर्वी गुलाबी रंगासोबत संसार थाटण्याची कल्पना सुचली होती. सध्या या लग्नाची बातमी सर्वत्र पसरत असून फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.