मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शेफ असूनही तरुणी खाते कच्चं मांस आणि अंडी, फळ आणि भाज्यांकडे फिरवलीय पाठ

शेफ असूनही तरुणी खाते कच्चं मांस आणि अंडी, फळ आणि भाज्यांकडे फिरवलीय पाठ

कालपरवापर्यंत सर्वसामान्यांसारखं जेवण (Woman claims she feel healthier after eating raw meat and eggs) करणाऱ्या एका तरुणीनं अचानक कच्चं मांस आणि अंडी खायला सुरुवात केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • Published by:  desk news

कालपरवापर्यंत सर्वसामान्यांसारखं जेवण (Woman claims she feel healthier after eating raw meat and eggs) करणाऱ्या एका तरुणीनं अचानक कच्चं मांस आणि अंडी खायला सुरुवात केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्याबाबत अनेक समस्या असणाऱ्या (Various efforts to cure stomach problem) या तरुणीनं त्यातून बरे होण्यासाठी अनेक उपाय केले. विशेषतः पोटाशी संबंधित आजारांनी ही तरुणी त्रस्त होती. मात्र अचानक तिच्या डोक्यात कच्चं मांस आणि अंडी खाण्याची कल्पना आली. तिनं त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि बघता बघता समस्या दूर झाली, असा अनुभव तिनं शेअर केला आहे.

असा झाला बदल

ही गोष्ट आहे हंगेरीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या निकोलस किस या तरुणीची. ही तरुणी पेशानं शेफ आहे. लोकांना वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवून खायला देणं, हा तिचा पेशा. मात्र आता स्वतःसाठी ती कुठल्याच प्रकारचं अन्न शिजवत नाही. ती सध्या फक्त कच्चं मांस आणि अंडी खाऊन स्वतःची गुजराण करत आहे. पोटाच्या आजारांवर उपचार म्हणून तिने कच्चं मांस आणि कच्ची अंडी खायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर झाल्या. आता आपल्याला फिट आणि आनंदी वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

मांस लागतं चविष्ट

निकोलस वेगवेगळ्या प्राण्यांचं कच्चं मांस खाते. प्रत्येक प्राण्याच्या मांसाची चव वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला ते खायला मजा येत असल्याचं ती म्हणते. वास्तविक, एकेकाळी आदिमानव हा प्राण्यांचं कच्चं मांस खाऊनच गुजराण करत असे. त्यानंतर आगीचा शोध लागला आणि भाजून किंवा शिजवून केलेल्या पदार्थांमुळे आपल्याला होणारे आजार टळत असल्याचं मानवाला समजलं. मात्र निकोलसच्या बाबतीत उलटा प्रवास झाल्याची चर्चा नेटिझन्स करत आहेत. डॉक्टरांनी नेमून दिलेल्या कॅलरीजच ती घेते, मात्र त्या केवळ कच्चं मांस आणि अंडी यांच्यामार्फतच. अगदी दोन ते चार आठवड्यांपूर्वीचा मांसाचा तुकडादेखील ती आनंदानं चघळू शकत असल्याचं सांगते.

First published:

Tags: Health, Synthetic meat, Viral news