औरंगाबाद 08 सप्टेंबर : एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर (Extra marital affairs) म्हणजे विवाहबाह्य संबंधांच्या बऱ्याच फिल्म तुम्ही पाहिल्या असतील. घरवालीसमोर बाहरवालीचा (Husband wife video) राज खुलताच काय होतं, ते आपण या फिल्ममध्ये पाहिलं आहे. प्रत्यक्षातही अशीच एक घटना घडली आहे. दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या नवऱ्याला बायकोने रंगेहाथ पकडलं (Wife caught husband with girlfriend). पुढे काय घडलं तुम्हीच पाहा.
घरवाली बाहरवाली खेळणाऱ्या या व्यक्तीचा खेळ संपला. अखेर त्याच्या बायकोसमोर त्याचा राज खुलला आणि मग काय बायकोने भररस्त्याच चांगलाच धडा शिकवला आहे (Wife beating husband on road video).
व्हिडीओत पाहू शकता, एक महिला रस्त्यावरून पळताना दिसत आहे. ती धावत एका हॉटेलसमोर येतं. तिथं काही गाड्या उभ्या असतात. गाड्यांजवळ एक पुरुष आणि एक महिला उभी असते.
हे वाचा - VIDEO - प्राण जाए पर मोबाईल ना जाए! धाडकन कोसळला पण हातातला फोन काही सोडला नाही
धावत येणारी महिला आधी त्या पुरुषाला जो तिचा नवरा आहे, त्याला मारते त्यानंतर त्या दुसऱ्या महिलेला पकडते आणि तिला चोप चोप चोपते. तिच्या नवरा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्या महिलेला मारतच जाते. तिथं असलेली एक व्यक्तीसुद्धा त्या महिलेला रोखायला येते पण महिला कुणाचंच ऐकत नाही.
ज्या महिलेला ती मारते आहे, तिने आपलं तोंड ओढणीने झाकलं आहे. ती कोण आहे हे समजावं म्हणून ही महिला तिच्या चेहऱ्यावरील दुप्पटा हटवण्याचा प्रयत्न करते. तिला धक्का देते. कारच्या आत नेऊनही चोप चोप चोपते. ही कोण आहे, कोण आहे, असं ती नवऱ्याला ओरडत विचारताना दिसते.
हे वाचा - VIDEO - मोबाईल नंबर मागताच तरुणीने काढली पायातील चप्पल; रोडरोमिओला धू धू धुतलं
giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ औरंगाबादचा आहे. सर्वांना बाहेरची बिर्याणी खायची आहे, घरातील डाळ-भात खायचे नाहीत, असं का? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.