नवी दिल्ली, 11 मे : दैनंदिन जीवनात आपल्या सोबत अनेक निरनिराळ्या गोष्टी घडतात. मात्र कामाच्या गडबडीत किंवा दुसऱ्या विचारात असल्यामुळे आपण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे अचाकन बसणारा करंट. तुम्ही कधी विचार केलाय का की, काही गोष्टींना अचानक स्पर्श झाल्यावर करंट का लागतो? यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया. घरामध्ये वावरताना आपला काही गोष्टींना अचानक स्पर्श होतो. मात्र स्पर्श होताच काही सेकंदातच आपल्याला करंट लागतो. काही गोष्टींमध्ये विजेचा प्रवाह नसतानाही त्या वस्तूंपासून आपल्याला करंट बसतो. पण हे असं का घडतं, यामागे काय शास्त्र आहे हे पाहुया.
करंट लागण्याचा प्रकार बहुतांश हिवाळ्यामध्ये बसतो. थंडीमध्ये करंट बसण्याचे प्रकार जास्त दिसून येतात. हिवाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रता असते. यामुळे अचानक काही गोष्टींना धक्का लागल्यावर सुई टोचल्यासारखा करंट लागतो. नकारात्मक इलेक्ट्रॉन आपल्या शरीरातून बाहेर जातात. ज्यामुळे आपल्याला विद्युत प्रवाह जाणवतो. काही शारीरिक हालचालींमध्ये असा धक्का काही इंच अंतरावरूनही जाणवतो. कोपऱ्याला जास्त प्रमाणात करंट लागतो. कोपऱ्याजवळ एक आल्नेर नर्व्ह आहे. ती मणक्यातून बाहेर पडते आणि थेट खांद्यांवरुन हाताच्या बोटांपर्यंत पोहोचते. कोपऱ्याचे हाड झाकणाऱ्या या मज्जातंतूला धक्का लागताच करंट बसतो. शरिरातील इलेक्ट्रॉन्सचे असंतूलन झाल्यावर जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा शरीरातील इलेक्ट्रॉन्स बाहेर पडू लागतात.