नवी दिल्ली, 21 मार्च : अनेक धोकादायक प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये बऱ्याच प्राण्यांमध्ये वर्षानुवर्षापासून शत्रुता चालत आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या हल्ल्याचे, शिकारीचे अनेक भयंकर व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये मुंगुस आणि नागाची शत्रुता तर सर्वांनाच माहिती आहे. नुकताच त्यांच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आलाय आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर चर्चेता विषय बनला. सध्या नाग आणि मुंगुसच्या शिकारीच्या थराराचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एका वन्यजीव प्राणी वापरकर्त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हे शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नाग vs मुंगूस कोण जिंकेल?” अनेक मुंगूस हर्पेस्टेस वंशाचे आहेत, जे विषारी सापांवर, नागांवर हल्ला करतात आणि मारतात. असे मुंगूस अतिशय वेगवान आणि अतिशय हुशार असतात. ते प्रथम सापाच्या डोक्यावर वार करतात आणि आपल्या जोरदार हल्ल्याने सापाला जखमी करतात.
व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुंगुस आणि नाग एकमेकांवर हल्ला करत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोघेही शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांशी दोन हात करत आहे. व्हिडीओमध्ये पुढे काय होतं माहित नाही मात्र अगदी काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर शिकारीच्या लढतीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगलातील व्हिडीओही समोर येत असतात. नेटकरीही असे व्हिडीओ अधिक पाहतात. अनेकांना वन्य प्राण्यांविषयी बरीच उत्सुकता असते. त्यामुळे ते जंगल सफारी, पार्कमध्येही जातात. जेणेकरुन त्यांना जवळून पाहता येईल. मात्र अनेकदा तेथाही धक्कादायक प्रकार समोर येतात.