Home /News /viral /

इथे दिसलं पांढरं इंद्रधनुष्य, नागरिक झाले अवाक

इथे दिसलं पांढरं इंद्रधनुष्य, नागरिक झाले अवाक

नागरिकांनी एका सकाळी आकाशाकडे पाहिलं आणि ते अवाक झाले. आकाशात इंद्रधनुष्य तर दिसत होतं, पण चक्क आणि फक्त पांढऱ्या रंगाचं.

    लंडन, 21 डिसेंबर: आकाशात अचानक पांढऱ्या रंगाचं इंद्रधनुष्य (White Colored Rainbow) दिसल्यामुळे नागरिकांना फारच आश्चर्य (Surprise) वाटलं. साधारणपणे पावसाळाच्या शेवटी (End of rainy season) इंद्रधनुष्य आकाशात दिसायला सुरुवात होते. ढगांवर सूर्याची किरणं (Sun rays on clouds) पडून जी जेव्हा परावर्तीत होतात, तेव्हा इंद्रधनुष्य तयार होतं. सात रंगांचं मनोहारी इंद्रधनुष्य पाहायला सर्वांनाच आवडतं. मात्र सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसण्याऐवजी जर अचानक पांढऱ्या रंगाचं इंद्रधनुष्य दिसलं, तर तुम्हाला काय वाटेल? ब्रिटनवासियांना नुकताच याचा अनुभव आला. दिसलं पांढरं इंद्रधनुष्य ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आकाशात पांढऱ्या रंगाचं इंद्रधनुष्य दिसत आहे. हे इंद्रधनुष्य फॉगबो या नावाने ओळखलं जातं. इंद्रधनुष्य दिसण्याची प्रक्रिया तीच असते, मात्र त्यातून सात रंग उमटण्याऐवजी केवळ एकच पांढरा रंग उमटतो आणि त्यामुळे पांढऱ्या रंगाचं इंद्रधनुष्य डोळ्यांना दिसतं. हा आहे फरक जेव्हा पाण्याच्या थेंबांवरून सूर्याची किरणं परावर्तीत होतात, तेव्हा त्यांचं सात रंगांमध्ये परिवर्तन होतं. मात्र जेव्हा हेच सूर्यकिरण धुक्यावर पडतात, तेव्हा मात्र एकच पांढऱ्या रंगाचा झोत तयार होतो आणि तो आकाशात पसरतो. सध्या ब्रिटनमध्ये कडाक्याच्या थंडीची सुरुवात होत असताना हे पांढरं इंद्रधनुष्य पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली आणि नागरिकांनी इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आपापल्या घराच्या बागेतच बैठक मांडली. विकेंड झाला आनंदी गेल्या शनिवारी ब्रिटनमधील अनेक भागांत हे पांढऱ्या रंगाचा इंद्रधनुष्य पाहता आलं. नोरफ्लॉक, सफोल्क आणि ऍसेक्स या भागातील नागरिकांना अधिक ठळकपणे हे इंद्रधनुष्य दिसलं आणि त्यांनी ते मनमुराद एन्जॉय केलं. हे वाचा - YouTube Video पाहून टाकला जबरी दरोडा, पुरावा शोधताना पोलिसांचीही दमछाक स्कॉटलंडमध्ये दिसलं होतं इंद्रधनुष्य यापूर्वी 2017 साली स्कॉटलंडमध्येदेखील अशाच  प्रकारे पांढऱ्या रंगाचं इंद्रधनुष्य पाहता आलं होतं. त्यावेळीदेखील धुकं आणि उन्हाचा खेळ सुरू असल्यामुळे पांढरं इंद्रधनुष्य अवतरलं होतं. हा नैसर्गिक सोहळा पाहण्याची नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते आणि एखादा सण साजरा केल्याप्रमाणे ते हा नैसर्गिक अविष्कार साजरा करतात.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Viral photo

    पुढील बातम्या