मुंबई, 30 जुलै : पक्ष्याला तुम्ही उडताना पाहिलं आहे, पोपटासारख्या पक्ष्याला बोलतानाही पाहिलं आहे. पण सध्या पक्ष्याचं असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. एका पक्ष्याने असं करतब करून दाखवलं आहे की पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल.
हा पक्षी दुसरा तिसरा कोणी नाही तर चक्क कबूतर आहे. चिठ्ठ्या पोहोचणाऱ्या कबुतराकडे हेसुद्धा टॅलेंट असतं का असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल.
व्हिडीओत पाहू शकता बरीच पांढरीशुभ्र कबुतरं दिसत आहेत. ही कबुतरं दाणे टिपत आहेत. त्यापैकी एक कबुतर अचानक असं काही करून दाखवतं की आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पण थोड्या वेळाने कबुतर तेच पुन्हा करतो.
हे वाचा - WOW! सरड्याप्रमाणे रंग बदलणारा पक्षी पाहिलाय का? VIDEO मध्ये पाहा निसर्गाचा अद्भुत चमत्कार
हा कबूतर चक्क बॅक फ्लिप मारतो. कबुतर असाच उडायचा प्रयत्न करत असेल आणि ते बॅक फ्लिपसारखं वाटत असेल, असं सुरुवातीला कुणालाही वाटावं पण तसं बिलकुल नाही. कारण तो पुढे सुद्धा बॅक फ्लिप मारून दाखवतो.
एकदा नव्हे दोनदा नव्हे किती तरी वेळा तो मागोमाग असे बॅक फ्लिप मारतो. जणू काही तो जिम्नॅस्टच आहे. आपल्याकडे अनोखं टॅलेंट आहे हे तो दाखवतो.
Wow🕊😍 pic.twitter.com/jpq2f4VDhJ
— Hana (@magicthings7) July 28, 2022
किती तरी वेळा तो मागोमाग असे बॅक फ्लिप मारतो. जणू काही तो जिम्नॅस्टच आहे. आपल्या कडे अनोखं टॅलेंट आहे हे तो दाखवतो. त्याला पाहताच तोंडातून अद्भुत असाच शब्द बाहेर येतो.
@magicthings7 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण थक्क झालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos