जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोबाईलच्या नादात व्यक्तीसोबत घडला विचित्र प्रकार, पूल साईड Video समोर

मोबाईलच्या नादात व्यक्तीसोबत घडला विचित्र प्रकार, पूल साईड Video समोर

व्हायरल

व्हायरल

लोकांना आजकाल मोबाईलचं व्यजन जडलं आहे. 24 तास मोबाईल सोबत घेऊन फिरतात. कुठेही गेलं तरी मोबाईल हा हवाच अशी प्रत्येकाची अवस्था झालीये.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मार्च : लोकांना आजकाल मोबाईलचं व्यजन जडलं आहे. 24 तास मोबाईल सोबत घेऊन फिरतात. कुठेही गेलं तरी मोबाईल हा हवाच अशी प्रत्येकाची अवस्था झालीये. मोबाईलशिवाय थोडाही वेळ राहू शकत नाही. मात्र मोबाईलचा अतिवापर कधी कधी खूप घातकही ठरतो. यामुळे अनेकांना बऱ्याच संकटांना तोंड द्याव लागतं, तर काहींची चांगलीच फजितीही होताना दिसते. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूलाच्या साईडने चालताना दिसतेय. मोबाईलवर बोलत बोलत व्यक्ती पुलाच्या साईडने मस्त आरामात चालतेय. तेवढ्यात व्यक्तीचा पाय घसरतो आणि ती पुलामध्ये पडणारच तेवढ्यात ती पुलाच्या कठड्याला पकडून स्वतःला सांभाळते. आणि पुन्हा मोबाईलवर बोलत बसते जसं की काही झालंच नाही. या घटनेदरम्यान व्यक्तीच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती उमटलेली दिसत नाहीये.

जाहिरात

@ShockingClip नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आलाय. अगदी काही वेळात या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. व्हिडीओवर खूप लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होताना दिसतोय. लोक त्या व्यक्तीच्या तत्परतेचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओ पाहिल्या हसूही येतंय आणि आश्चर्यही वाटतंय. व्हिडीओ अधिक वेळा पाहिला जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर असे रंजक व्हिडीओ अनेकवेळा व्हायरल होतात. निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ नेटकऱ्यांचं कायमच लक्ष वेधताना दिसतात. मोबाईलमध्ये मंत्रमुग्ध झाल्यावर तुमच्यासोबतही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मोबाईलचा गरजेपुरता वापर करणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात