बीजिंग, 29 जून : एखाद्याचा मृत्यू होणं म्हणजे सर्वात दुःखाचा क्षण असतो. संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. संपूर्ण कुटुंब शोकात असतं, त्यांच्या पोटात अन्नाचा कण जात नाही की पाण्याचा घोट त्यांना घ्यावासा वाटत नाही. असं असताना एक असं ठिकाण जिथं चक्क एखाद्याच्या मृत्यूनंतर अश्लील डान्सचा तमाशा होता. धक्कादायक म्हणजे नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोकडूनही असा डान्स शो असतो. अंत्यसंस्कारा ची अशी विचित्र प्रथा आहे. व्यक्तीला अंतिम निरोप देण्याच्या, अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या परंपरा-प्रथा असतात. काही अंत्ययात्रा वाजतगाजत नेल्या जात असल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. पण ही परंपरा तर धक्कादायकच आहे. सर्वात दुःखाच्या क्षणी अशी विचित्र परंपरा निभावली जाते. अंत्यसंस्कारदिवशी अश्लील डान्सर्सचा डान्स शो ठेवला जातो.
एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारावेळी अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींना बोलावलं जातं. चीनच्या ग्रामीण भागातील ही खूप जुनी परंपरा आहे, पण आजही काही भागात ही परंपरा निभावली जाते. बदलत्या काळानुसार या परंपरेत थोडा बदल झाला आहे. अगदी बायकोसुद्धा आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्ट्रिप डान्सर्सना बोलावते. अंत्यसंस्कारावेळी या स्ट्रिप डान्सर्स अश्ली डान्स करतात आणि रडण्याचं नाटक करतात. Weird Tradition : कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर कापतात महिलांची बोटं; कारणही धक्कादायक आता ही अशी विचित्र परंपरा का त्यातून काय साध्य होतं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीला चांगल्या प्रकारे शेवटचा निरोप मिळावा, या हेतूने ही परंपार निभावली जात असल्याचं सांगितलं जातं. तसंत अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त लोक जमा व्हावेत हासुद्धा यामागील उद्देश आहे, असं म्हटलं जातं. डान्सर बोलावल्याने जास्तीत जास्त लोक येतात. अंत्यसंस्कारात जितके जास्त लोक तितकं मृताच्या आत्माला जास्त शांती मिळते, असं मानलं जातं. Weird Tradition : इथं लोकांना मृत्यूही हवाहवासा वाटतो; 7 वर्षे आधी स्वतःच करतात आपल्या मरणाची तयारी रिपोर्ट नुसार चीनी सरकारने या विचित्र परंपरेवर निर्बंध घातले आहेत. तरी काही ग्रामीण भागात ही परंपरा अद्यापही कायम आहे.