नवी दिल्ली, 01 जून : लग्न म्हटलं की विधी, परंपरा अशा अनेक गोष्टी आल्या. यासोबत मजा मस्तीही आलीच. लग्नात मित्र असतील तर लग्नाची मजा आणखीनच वाढते. सोशल मीडियावर तर असे लग्नातील अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच लग्नातील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मित्रांनी नवरदेवासोबत केलेली करामत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लग्नादरम्यान, वराचे मित्र आनंदी मूडमध्ये असतात आणि मजा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वराचा मित्र लग्नाच्या वेळी त्याला गुपचूप दारू पाजतात.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि नवरदेव सॉफ्ट ड्रिंकची एक छोटी बाटली उघडतो आणि त्यातून एक चुस्की घेतो. परंतु काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. नवरदेवाचे मित्र त्याला कोल्ड्रिंकची बॉटल देतात. मात्र ते पिल्यावर नवरदेव खूप विचित्र रिअॅक्शन देतो. त्याला समजतं की त्याच्या मित्रांनी कोल्डिंगमध्ये काहीतरी मिसळून दिलं आहे. ते पिताना तो नवरीकडे पाहतो आणि नवरीलाही त्याच्या रिअॅक्शन वरुन ती कोल्ड्रिंक नसल्याचं समजतं.
‘कनुमुरीरावी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्स येत असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान, लग्नातील मित्रांच्या करामतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. असे व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येतात.