नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काय करतील त्याचा पत्ता नाही. आगळ्यावेगळ्या गोष्टी लोकांचं लक्ष वेधून घेतात. काही लोकांना विचित्र गोष्टी लोकांचं लक्ष विचलित करतात आणि त्यांना सतत तेच करायला आवडते. इतकंच नाही तर काही लोक ट्रेंडमध्ये येण्यासाठी विचित्र चॅलेन्ज देतात आणि जेणेकरून ते इतरांनाही असे करण्यास सांगत असतात. जगभरात असे अनेक लोक आहेत जे विचित्र गोष्टी करून नेटिझन्सचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पेरू (Guava) खायला शिकवत आहे.
असा पेरू तुम्ही कधी खाल्ला आहे का?
पेरु खाण्याची ही पद्धत तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला पोट धरून हसणं थांबवता येणार नाही. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत आणि मजेदार कमेंट करत आहेत. एवढंच नाही तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये #memeschallenge असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. म्हणजेच जर तुम्हीही हे करू शकत असाल तर तुमचा व्हिडिओ बनवा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करा.
तरुणीचा पेरू खाण्याची अनोखी पद्धत
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी दिसत आहे. तिच्या हातात पेरूचा तुकडा आहे. यानंतर तरुणी कॅमेऱ्यासमोर कापलेला पेरू दाखवते आणि तोंडात टाकते. पेरूचा भाग इतका मोठा असतो की तो सहज चघळता आणि गिळता येत नाही. तरुणी तोंडात ठेवलेला पेरूचा भाग तिच्या दाताने लहान तुकडे करत आहे आणि चघळल्यानंतर तो गिळत आहे. असं केल्यानं ती हळूहळू संपूर्ण भाग खाते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
या व्हिडिओतील तरुणीचे हावभाव पाहून तुम्हालाही हसू आवरू शकणार नाही. एका तरुणीची पेरू खाण्याची ही विचित्र पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत साडे सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. संकेत गावडे नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Social media viral