जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वाघावर अस्वल पडला भारी; शिकारीच्या नादात झाली भलतीच फजिती...पाहा Video

वाघावर अस्वल पडला भारी; शिकारीच्या नादात झाली भलतीच फजिती...पाहा Video

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. विविध फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असतात. खास करुन व्हिडीओ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. विविध फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असतात. खास करुन व्हिडीओ. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. प्राण्यांचे व्हिडीओ पाहण्यास नेटकऱ्यांची जास्त पसंती असते. जंगलातील शिकारीचे बरेच व्हिडीओ समोर येत असतात. आता यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका वाघाचा आणि अस्वलाचा आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की अस्वल जंगलात फिरत आहे. अचानक तेथे एक वाघ येतो. तो दबक्या पावलात मागून अस्वलाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. वाघ जेव्हा अस्वलाच्या अंगावर झेप घेतो तेवढ्यात अस्वलही रागात वाघाच्या अंगावर धावतो. त्यानंतर वाघ त्या ठिकाणावरुन धूम ठोकतो. वाघाच्या मागे अस्ललही धावताना दिसत आहे. त्यामुळे वाघाची अस्वलाने पुरती फजिती केल्याचं दिसून येतंय. मात्र व्हिडीओमध्ये दिसत असलेला वाघ नवघा आणि वयाने छोटा असल्याचं दिसतंय.

जाहिरात

वाघ आणि अस्वलाच्या या शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर प्रतिक्रियाही देत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. असे व्हिडीओ नेटकरी पसंत करतात. वाघला पाहून सहसा प्राणी घाबरतात आणि पळून जातात. मात्र काही प्राणी वाघाशीही दोन हात करताना दिसून येतात.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक मजेशीर, भावुक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ पहायला मिळतात. याशिवाय प्राण्यांच्या शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरत असतात. यामध्ये प्राणी एकमेकांना जखमी करतात. माणसांसोबतही एकाद्या प्राण्याची झुंज झाली तर ते त्याला जखमी करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात